अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट ठार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : शिकारीच्या शोधात जंगल परिसरातून राष्ट्रीय महामार्ग पार करणाºया बिबट्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुदैर्वी घटना लाखनी – साकोली महामार्गावर मुंडीपार सडकजवळ असलेल्या धाब्याजवळ रात्री ११.२० वाजताच्या सुमारास घडली. बिबट ठार झाल्याचे माहिती होताच परिसरातील नागरिकांची गर्दी झाली. या घटनेची माहिती तात्काळ वनविभागाला देण्यात आली. ठार झालेली बिबट अंदाजे दोन वर्षे वयाची आहे. शिकारीच्या शोधात ती रात्री राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असताना यादव धाबा आणि रॉयल धाबा यांच्यामध्ये पोहोचताच अज्ञात वाहनाने तिला जबर धडक दिली. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला.
वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. रात्रीच बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेऊन लाखनी परिक्षेत्राअंतर्गत येणाºया जांभळी नर्सरी येथे मृतदेह नेण्यात आला. सहाय्यक वनसंरक्षक रोशन राठोड वनक्षेत्र अधिकारी सुरज गोखले एनजीओ चे अरशद पठाण तसेच वन कर्मचाºयांच्या उपस्थितीत वैद्यकीय अधिकारी डॉ सव्वाशे यांनी मृत बिबट्याचे शवविच्छेदन केले.शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *