केंद्र सरकारच्या अध्यादेश विरोधात तुमसरात आम आदमी पक्षाचे निदर्शने

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : दिल्ली येथील आम आदमी सरकारच्या विरोधात केंद्रातील भाजप सरकारने एक लोकतंत्र विरोधी काळा अध्यादेश काढला असून त्या काळ्या अध्यादेशाच्या विरोधात आम आदमी पक्षाच्या वतीने तुमसर येथील बावनकर चौकात निदर्शने व आंदोलन करण्यात आले. दिल्ली तील आम आदमी पार्टीच्या सरकारला कायदे बनवण्याचा आणि नोकरशहावर नियंत्रण ठेवण्यात अधिकार देणाºया सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला नकार देणाºया केंद्रातील भाजप सरकारच्या काळ्या अध्यादेशाविरोधात आम आदमी पार्टीच्या वतीने सर्वत्र केंद्र सरकार चा जाहिर निषेध आंदोलन करण्यात आले. आम आदमी पार्टी च्या वतीने राम लीला मैदान वर महा रैलीचे अयोजन करण्यात आले त्याच्या समर्थनार्थ संपुर्ण देशासह महाराष्ट्र राज्यात देखील राज्यभर आदमी पार्टी च्या वतीने निषेध धरणे आंदोलन निदर्शने कार्यक्रम घेण्यात आले .

त्यानुसार दिनांक ११ जून रविवार रोजी आम आदमी पार्टी तुमसर तालुका व शहर च्या वतीनेयेथे केंद्र सरकारच्या विरोधामध्ये तानाशाही नही चलेगी, काळा अध्यादेश वापस घ्या च्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी तालुका अध्यक्ष उज्वल सहारे, शहर अध्यक्ष सोहनलाल भूरे,तालुका संगठन मंत्री राजकुमार उखरे, तालुका सचीव नितिन बोरकर,शहर युवा अध्यक्ष दीपेन्द्र बोपचे, शहर सचिव अमित बावनकर,तालुका उपाध्यक्ष संजय चौधरी,तालुका सह सचिव प्रमोद राऊत,तालुका एस सी सेल अध्यक्ष सचिन नागदेवे, कामगार सेल चे शंकर ठवकर, महिला आघाडी च्या स्मिता बांसोड,अश्विन आगसे, अल्प संखेक सेल फिरोज शेख रिजवान पठान,प्रकाश परधी,प्रमोद चिंधालोरे व शेकडो समर्थक उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *