तलाठी अधिका-यांच्या निष्काळजीपणामुळे लाभार्थ्यांचा अनुदान शासनाकडे गेले परत

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तलाठी अधिका-यांच्या निष्काळजीपणामुळे एका पिडीत कामगार मजूर महिलेचे नैसर्गिक आपत्ती झालेल्या नुकसानीचे ३० हजार रुपये अनुदान शासनाकडे परत गेल्याचे शिवसेनेच्या वतीने पिडीत कुटूंबासह तलाठी यांना घेराव करुन जाब विचारण्यात आला. शहरातील गांधी नगर येथील रहिवासी मजूर कामगार दुर्गाबाई काशीराम गभने यांचे घर विटामातीचे असून २३ सप्टेंबर २०२२ रोजी नैसर्गिक आपत्ती झालेल्या नुकसानीने त्यांच्या घरातील जुनी मातीची भिंत अचानक कोसळली. सुदैवाने येथे जीवितहानी झाली नाही. परंतु यामुळे गभने कुटुंबियांचा मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. याबाबतची माहिती तुमसरचे तलाठी यांना देऊन ताबडतोब घटनास्थळी जाऊन आपतग्रस्तांचे बयाण, चौकशी व पंचनामा करून पीडित कुटुंबाला लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळवून देण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती.

त्या अनुषंगाने तलाठी अधिका-यांमार्फत स्थळ निरीक्षण चौकशी पंचनामा तयार करण्यात आला होता. मात्र कोतवालाने कसल्याही प्रकारची शहानिशा न करता काही राजकीय व्यक्तीचा सांगितल्यानुसार व राजकीय दबावाखाली पंचनाम्यात फेरबदल करून त्यामध्ये सदर घर श्रीराम गभने यांचे नावे असून विवादग्रस्त असल्याचे टिपणी नोंदवली. परिणामी शासनाकडून लाभार्थ्यांना मिळणारा ३० हजार रुपयेअनुदान हा परत गेला. यामुळे गभने कुटुंबियांनी शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित मेश्राम यांना सदर याप्रकरणी माहिती दिली. दरम्यान याबाबत दखल घेऊन तहसील कार्यालयातील तलाठी यांना याप्रकरणी घेराव घालून जाब विचारला गेला, यावर त्यांनी कार्यालयातील कोतवालाकडून नजरचुकीने चुका झाल्याचे मान्य केले. तसेच तहसील कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाचे जयसिंग रावते यांनी याप्रकरणी तहसीलदार साहेबांकडे पुन्हा पंचनामा दुरुस्ती करून पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले.

यामुळे आपतग्रस्त गभने कुटुंबियांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागला. याबाबतची माहिती जिल्हाधिका-यांनादेणार असून यापुढे अश्या प्रकारे तलाठी कार्यालयाकडून हलगर्जी व चुका पुन्हा होऊ नये यासाठी त्यांना योग्य ती सूचना व समज देण्यात यावे अशी मागणी पीडित कुटुंबियांसमवेत करणार असल्याचे शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित एच. मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते तथा अनुसूचित जमातीचे अनिल टेकाम, शिवसेनेचे शाखा प्रमुख निखिल कटारे, पुष्पक त्रिभुवनकर, आदित्य गभने, तुषार लांजेवार, स्वप्निल बडवाईक, रितेश शेंडे, गणेश भुरे यांच्यासह पीडित कुटुंब मजुर कामगार तुळशीराम गभने, आकाश गभने, दुर्गाबाई गभने, वंदना गभने उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.