मृत्यू पावलेल्या साठवणे यांच्या जीवन ज्योती विम्याचे रक्कम जमा करा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : शहरातील माकडे नगर येथील रहिवासी स्वर्गीय अनिल नारायण साठवणे यांच्या कर्करोगाच्या आजाराने जानेवारी २०२२ मध्ये निधन झाले होते. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजने अंतर्गत मृत्यू पावलेल्या अनिल साठवणे यांच्या विमा संरक्षण नुसार रक्कम मिळणे गरजेचे होते. परंतु नऊ महिने होऊन अद्यापही त्यांच्या कुटुंबाला विम्याचे पैसे मिळाले नाही. यासंदर्भात प्रतिमा अनिल साठवणे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाºयांना संपर्क साधून विम्याचे पैसे मिळण्यासाठी मदत मागितली. याप्रकरणी तातडीने लक्ष वेधून सेंट्रल बँक आॅफ इंडिया शाखा तुमसर येथे जाऊन बँकेच्या प्रबंधकाशी यावर माहिती जाणून घेत सविस्तर चर्चा केली. मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या पत्नीला प्रधानमंत्री जीवन ज्योती विम्याचे पैसे आजपर्यंत का नाही मिळाले याची चौकशी केली. यामध्ये काही तांत्रिक त्रुटी असल्यास अर्जदारास कळवण्यास सांगितले. तसेच प्रलंबित असलेली रक्कम ताबडतोब देण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने शाखा व्यवस्थापकांना करण्यात आली. दरम्यान सेंट्रल बँक आॅफ इंडिया शाखेकडून याप्रकरणात संबंधित मुंबई मध्य कार्यालयात ई-मेलद्वारे संपूर्ण माहिती देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. यावेळी शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित एच. मेश्राम, शाखा प्रमुख पुष्पक त्रिभुवनकर, योगेश चिंधालोरे, गोलू पारधी सह मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या पत्नी प्रतिमा साठवणे उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.