जिल्हा ग्राहक मंच चा सहारा इंडिया समुहाला दणका

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर:- आरडी, व एफ डी चे पैसे मॅचूरीटी होवून देखील मॅचूरीटीचे पैसे देण्यास टाळाटाळ करून शारारिक व मानसिक त्रास देत असल्याने ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल करताच सहारा इंडिया समूहाला ९ टक्के व्याजासहित संपूर्ण रक्कम परत करण्याचे आदेश देत समूहाला चांगलाच दणका दिला आहे. अशोक मेश्राम व आशा मेश्राम रा. विनोबा नगर तुमसर यांनी सहारा इंडिया क्रेडिट मल्टीस्टेट को आॅफ सोसायटी तुमसर शाखेत वेग- वेगळे आर डी, तसेच एफ डी मध्ये अनुक्रमे ८,४९,५३८ रु तसेच ४,९४,८४८ रू. असे ठेवले होते. सदर ची म्याचूरिटी ही सन २०१८ ते २०२१ दरम्यान झाली होती, मात्र म्याचूरिट होऊन सुद्धासहारा इंडिया च्या तुमसर शाखेने गुंतवणूक दारास ती रक्कम देण्यास टाळाटाळ करून शाररिक व मानसिक त्रास देत होते. परिणामी जिल्हा ग्राहक मंचाकडे दी सप्टेंबर २०२२ मध्ये तक्रार दाखल केली असता मार्च २०२३ मध्ये या प्रकरणावर सुनावणी घेत पुराव्याचा आधारावर सहारा इंडीया समहूला अशोक मेश्राम व आशा मेश्राम यांनी जमा केलेल्या रक्कमेवर ९% व्याजा सहित १०१० हजार रू. शारीरिक व मानसिक नुकसान भरपाई तसेच तक्रारी संबधीत खर्च १०-१० हजार रू देण्याचे आदेश दिले तसेच सदर ९% व्याज हा संपूर्ण रक्कमेचा प्रत्यक्ष अदागाई पर्यंत लागू राहील व सदर रक्कंम ही मेश्राम ह्यांना ३० दिवासचे आत अदा करावेत,असे आदेश करण्यात आले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *