महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे माहितीपत्रक अद्ययावतच

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे माहितीपत्रक हे अद्ययावत व परिपूर्ण आहे. त्यावर मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे व मा. उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचेच छायाचित्र आहे. तसेच माहितीपत्रकात शासनाच्या विविध योजनांचे सविस्तर तपशील आहेत, असा खुलासा महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, मुंबई यांच्या वतीने प्रसिध्दीपत्रकाव्दारे केला आहे. महात्मा फुले महामंडळावर उध्दव ठाकरेच मुख्यमंत्रीै अशा आशयाची बातमी काही वर्तमानपत्रात प्रसिध्द झाली होती. त्यासंबंधी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या वतीने हा खुलासा करण्यात आला. माहितीपत्रकात अनुदान योजना, प्रशिक्षण योजना, बीजभांडवल योजना, मुदती कर्ज योजना, सुक्ष्मपत पुरवठा योजना, महिला समृध्दी योजना, महिला अधिकारिता योजना, उच्च शैक्षणिक योजना यासंबंधी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. तसेच महामंडळाच्या वतीने वेळोवेळी संकेतस्थळ व कंपनीची माहितीपत्रके अद्ययावत केली जातात.

परंतु, काही संघटनांनी जाणीवपूर्वक जुने माहितीपत्रक प्रसिध्द करून चुकीची माहिती वर्तमानपत्रांना दिली असल्याचे महामंडळाने दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे. महात्मा फुले विकास महामंडळ मर्यादित, मुंबई हे समाजातील अनुसुचित जाती व जमातीच्या सर्वांगिण प्रगतीसाठी काम करत आहे. आतापर्यंत समाजातील उपेक्षित व वंचित घटकांना न्याय देऊन त्यांच्या सर्वांगिण उन्नतीसाठी महामंडळ कायम प्रयत्नशील आहे. विविध योजनांचा लाभ हजारो गरजूंनी घेतला असून समाजातील अनुसूचित जाती व जमातील घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम महामंडळाच्या माध्यमातून केले जात आहे. मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे व मा.उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी कायमच महामंडळाच्या माध्यमातून समाजातील अनुसूचित जाती व जमातीच्या घटकांना आर्थिक प्रगतीबरोबरच त्यांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे.

जुहू येथील कार्यालयाचे लवकरच नुतनीकरण

जुहू येथील कार्यालयाचे लवकरच नुतनीकरण करण्यात येणार असून त्याबाबतच्या सूचना संबंधित अधिकाºयांना दिल्या आहेत. अनुसूचित जाती व जमातीतील घटकांसाठी विविध योजना व प्रकल्प महामंडळाच्या माध्यमातून व महाप्रित या उपकंपनीच्या माध्यमातून राबविले जात असून अनुसुचित जाती व जमातीतील घटकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळ व महाप्रितच्या वतीने करण्यात आले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *