क्षत्रिय समाजातर्फे वीर महाराणा प्रताप जयंती साजरी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : क्षत्रिय समाज भंडारा तर्फे वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची ४८३ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यानिमित्त सोमवार २२ मे रोजी स्थानिक महाराणा टाईम्स कार्यालय परिसरात क्षत्रिय समाज महिलांकडून भजनसंध्या कार्यक्रम घेण्यात आला. रात्री ८ वाजता दीप प्रल्वलन व वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे विधीवत पूजन करुन वीर महाराणा प्रताप यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे संचालन अर्चना बाच्छील यांनी तर आभार विवेकसिंह बाच्छील यांनी मानले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.