विनापरवाना लाखोंची शासकीय खनिजसंपत्ती फस्त

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : मुजबी ते कारधा दरम्यान ६ पदरी राष्टÑीय महामार्गाचे बांधकाम करणाºया स्वामी समर्थ बिल्डकॉन प्रा.लि.कंपनीकडुन शासनाची लाखो रूपयांच्या खनिजसंपत्ती फस्त करण्याचा प्रकार सर्रासपणे सुरू असुन याकडे महसुन,खनिकर्म विभागासह इतरही विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरीक करीत आहेत. भंडारा शहरात निर्माण होणारी वाहतुक कोंडी व यासह वाढते अपघात यावर नियंत्रण मिळविणे किंबहुना याला पर्याय म्हणुन मुजबी ते कारधा असा सहा पदरी राष्टÑीय महामार्गाचे बांधकाम युध्दपातळीवर सुरू आहे.सदर महामार्गाचे बांधकामाचे कंत्राट स्वामी समर्थ बिल्डकॉन प्रा.लि.कंपनी ला आहे.मात्र सदर कंपनी प्रशासनाकडुन शासकीय कामातच शासकीय नियमांची खिल्ली उडविली जात आहे. या राष्टÑीय महामार्गाच्या रस्त्याच्या बांधकाम चोरीचा मुरूम व मातीचा उपयोग होत असल्याने महसुल विभागाचे लाखोरूपयाचे नुकसान होत असल्याचे नागरीकांचे म्हणणे आहे. कंत्राट मिळविण्या करीता सदर कंपनीने इतर कंत्राटदार कंपनीच्या तुलनेत सर्वाधीत कमी बोली लावली होती व त्याची भरपाई आता शासकीय महसूल बुडवून करण्यात येत असल्याचा आरोप नागरीक करीत आहेत. उघडले असता आगीचे रौद्ररूप धारण केलेले दिसले. तात्काळ मिळेल त्या साहित्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.

सदर कंपनीतर्फे कारधा टोल नाका परिसरात असलेल्या अवाढव्य पहाडीचे रात्रं-दिवस उत्खन करून अर्ध्यापेक्षा जास्त पहाडी कंपनीने फक्त मौखिक आदेशाने विना रॉयल्टी उतखन केल्याची माहिती आहे. या उत्खननामुळे पहाडी लागत असलेल्या विद्युत तारेला इजा होऊन मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर प्रकरणी महसूल अधिकारी,राष्ट्रीय महामार्ग अधिकारी,पोलीस विभागांसह सर्वांना कंपनी मार्फत प्रत्येक प्रत्येक महिन्याला प्रसाद मिळत असल्यानेच या अवैध उत्खननाला कुणीही आळा बसविण्याचा प्रयत्न करीत नसल्याचे बोलल्या जात आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *