जिल्ह्यातील १० हजार कार्यकर्ते नागपूर येथिल मोर्चात सहभागी होणार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे नागपूर येथे दिंनाक १९ जानेवारी सोमवारला होणाºया शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार, विद्यार्थी व सामान्य नागरिकांच्या विविध मागण्यासाठी मोर्चा आयोजित कलेला आहे. हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत जिल्हा अध्यक्ष नाना पंचबुद्धे, आमदार राजू कारेमोरे, माजी खासदार मधुकर कुकडे, प्रदेश महासचिव धनंजय दलाल, अभिषेक कारेमोरे या सर्व मान्यवरांनी सदर मोर्चात जास्तीत जास्त लोकांचा सहभाग कसा होईल या बाबद मार्गदर्शन केले. बैठकीत भंडारा जिल्ह्यातील सर्व विधानसभा अध्यक्ष, तालुका /शहर अध्यक्ष यांचा आढावा घेण्यात आला व जास्तीत जास्त कार्यकर्ते व लोकांचा सहभाग होईल या बाबदचे नियोजन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष नानाभाऊ पंचबुधे, प्रदेश महासचिव धनंजय दलाल, माजी खासदार मधुकर कुकडे, महिला अध्यक्षा सरिता मदनकर, जिल्हा परिषद गट नेते अविनाश ब्राम्हणकर, सौ रत्नमाला बंडू चेटूले, डॉ रविंद्र वानखेडे, डॉ जगदीश निंबार्ते, यशवंत सोनकुसरे, धनेंद्र तुरकर, नरेंद्र झंझाड, एकनाथ फेंडर, विजय सावरबांधे, अभिषेक कारेमोरे, गंगाधर डोंगरे, हेमंत महाकाळकर, हरिश तलमले, सदाशिव ढेंगे व मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *