राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एकाच दिवशी ६४८ प्रकरणे निकाली

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा जिल्हा न्यायालयाज दिनांक १२ नोव्हेबर २०२२ रोजी आयोजीत राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एकाच दिवशी ३६९ प्रलंबित प्रकरणे तर २७९ दाखल पूर्व प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांचे निर्देशानूसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा राजेश गो. अस्मर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व फौजदा- री व दिवाणी न्यायालय, कौटूंबीक न्यायालय, कामगार न्यायालय,औद्योगीक न्यायालय, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. सदर लोकअदालतीचे उद्घाटन नालसा गीत वाजवूण करण्यात आली. या लोकअदालतीमध्ये न्यायालयातील प्रलंबित असलेले एकूण ९३८२ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी १९ मोटार अपघात प्रकरणे, २८ वैवाहीक वादाची प्रकरणे, ६३ एन. आय. अ‍ॅक्ट प्रकरणे, १९ रक्कमवसुलीची प्रकरणे, १ कामगार वादांची प्रकरणे, ७० इतर फौजदारी व दिवाणी स्वरुपाची प्रकरणे, ७ ग्राहक तक्रार निवारण आयोगातील प्रकरण तसेच न्याय पुर्व प्रविष्ठ २७९ प्रकरणे निकाली काढण्यात आली. याकरिता पॅनल सदस्य म्हणून न्यायाधीश, अधिवक्तागण व समाजसेवकांनी काम पाहीले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *