बी.एस.क्राईम इंडिया न्यूज चॅनलचे जीमेल खाते हॅक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : बी. एस. क्राईम इंडिया न्यूज या युट्यूब चॅनलचे अज्ञात व्यक्तीने जीमेल खाते हॅक केल्याने चॅनलच्या कामकाजावर त्याचा विपरीत परिणाम होत असुन भविष्यात अनुचित प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही करीता जीमेल खाते हॅक करणाºया व्यक्तीचा शोध घेवुन त्याचेवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी व्हॉईस आॅफ मिडीया संघटनेतर्फे भंडारा जिल्हा पोलीस अधिक्षक यांना दिलेल्या निवेदनातुन करण्यात आली आहे. भंडारा येथील शमशेर खान यांच्या मालकी असलेल्या बी. एस. क्राईम इंडिया न्यूज (bscrimeindianews@gmail.com)
या युटयुब न्यूज चॅनलचे संपुर्ण प्रसारणाचे काम तसेच इतरही कामकाज चॅनलच्या जीमेल आयडीवरुन तकीया वॉर्ड स्थित चॅनलच्या कार्यालयातून चालते .

दि. १२ एप्रिल २०२४ ला सायंकाळी तकीया वॉर्ड येथील प्लॉटधारक यांनी शासकीय कामात अडथळा आणत भंडारा नगर परिषदे मार्फत सुरु असलेल रस्त्याचे बांधकाम थांबवून रस्त्यावर खांब गाडून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करीत असताना बी. एस. क्राईम इंडिया न्यूज तर्फे त्याचे लाईव्ह न्युज सुरु होते. दरम्यान ७.३० वाजेपासून जीमेल व युटूब चॅनल हँक करण्यात आले असून चॅनेलचे जीमेल व युटूब चॅनल वर कोणत्याही प्रकारचे काम करता येत नाही. बी. एस. क्राईम इंडिया जीमेल े मोबाईलवरुन पासवर्ड मध्ये फेरबदल करण्याचा प्रयत्न करण्यात आला चॅनलचे जीमेल आयडीसुध्दा आता उघडता येत नाही. चॅनल लाखोंच्या संख्येत प्रेक्षक बघत असतात.

अशा परिस्थितीत चॅनलचे जीमेल अकाउंट व युटूब अकाउंट हॅक झाल्याने चॅनलचे मोठे नुकसान होत आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या ंमाध्यमावरअशा प्रकारचा अन्याय होवू नये करीता सदर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन चॅनलचे जीमेल व युटयुब चॅनल पूर्ववत सुरु करण्यास आवश्यक ती मदत करण्यात यावी तसेच जीमेल हॅक करणाºया व्यक्तीचा शोध घेवुन त्याचेविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनातुन करण्यात आली. निवेदन देतांना बी. एस. क्राईम इंडिया न्यूज इंडिया चॅनलचे मुख्य संपादक समशेर खान,गोपालकृष्ण मांडवकर,नंदु परसावार,नदीम खान, विजय निचकवडे,दिपेंद्र गोस्वामी, सागर भांडारकर,राकेश चेटुले, विलास सुदामे,शुभम देशमुख,अक्षय खोब्रागडे तसेच व्हॉईस आॅफ मिडीयाचे पदाधिकारी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.