यूपीएससी परीक्षेत विदर्भाच्या विद्यार्थ्यांची बाजी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा २०२३ चा अंतिम निकाल आज जाहीर झाला आहे. यात महाराष्ट्रासह नागपूरच्या निकालाचा टक्का वाढला आहे. गेल्या दोन परीक्षांमध्ये यूपीएससीचे पहिले तीन क्रमांक मुलींनीच पटकावल्याचे दिसून आले होते. यंदा मात्र मुलांनी बाजी मारली आहे. दरम्यान आदित्य श्रीवास्तव देशात पहिला तर अनिमेश प्रधान देशात दुसरा आला आहे. यात नागपूरसह विदभार्तील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. यंदा नागपूरमधून चार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर नागरी सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्राच्या पाच विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. यंदा यूपीएससीच्या परीक्षांमध्ये १०१६ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. वढरउ ी७ें १ी२४’३ यामध्ये ३४७ उमेदवार खुल्या प्रवगार्चे, ११६ उमेदवार आर्थिकदृष्ट्या मागासप्रवगार्चे, ३०३ उमेदवार ओबीसी प्रवगार्चे, १६५ उमेदवार अनुसूचित जाती प्रवगार्चे तर ८६ उमेदवार अनुसूचित जमाती प्रवगार्चे आहेत.

नागरी सेवा मुख्य परीक्षा डिसेंबर महिन्यात घेण्यात आल्या होत्या. त्याचा निकाल मार्च रोजी जाहीर होऊन यात उत्तीर्ण होण्याºया विद्यार्थ्यांच्या आॅगस्ट महिन्यात मुलाखती घेण्यात आल्यात.नागपूरमधून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमध्ये सुरेश बोरकर(६५८), मयुरी महल्ले (७९४), प्रांजली खांडेकर(७६१), शुभम डोंगरदिवे (९६३) यांचा समावेश आहे. तर पूर्व प्रशिक्षण केंद्रामधून उत्तीर्ण झालेल्यांमध्ये राजेश्री देशमुख(६२२), शुभम पवार(५६०), शुभम डोंगरदिवे (९६३ ), चिन्मय बन्सोड(८९३), अपूर्व बालपांडे(५४६) यांचा समावेश आहे. यंदा विदभार्तील विद्यार्थ्यांचा टक्का वाढल्याचे चित्र आहे. पूर्व परीक्षा प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून यंदा ९२ विद्यार्थ्यांनी मुलाखतीची तयारी केली होती. यावर्षी नागपूर आणि विदभार्तील उत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे निकाल या संकेतस्थळांवर सविस्तर निकाल पाहाता येईल.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.