करडी-पालोरा परिसराला वादळासह गारपिटीचा तडाखा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मोहाडी : तालुक्यातील करडी परिसरात मंगळवार दुपारी ४ वाजताच्या सुमारास आलेल्या चक्रीवादळ, गारपिटीसी मुसळधार पावसाने दानादाण उडाली असुन अनेकांचे नुकसान झाले. शेतातील सोलर कृषीपंप उखडून पाच ते दहा फुटावर फेकले गेले. सोलर पॅनल तुटले. शेकडो घरांवरील टिनपत्रे उडाले तर कौलारू घरांचे नुकसान झाले. पालोरा, करडी परीसरात गारपिटसह चक्रीवादळाचा तडाखा बसला त्यात वादळी पावसाने शेकडो घरावरील टिनपत्रे उडाल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले. गारपिटीने गावठी कवेलू फुटल्या. अल्पावधीत गोरगरिबांच्या झोपड्या उद्धवस्त झाल्या. चक्रीवादळाचा तडाखा इतका भयानक होता की, बासांसह टिपपत्रे २०० ते ३०० फुटावर फेकले गेले. सुदैवाने कुणीही यात न सापडल्याने जीवीतहानी टळली. लग्न समारंभातील स्टेज उडाले तसेच अन्नाची नासाडी झाली. मंडप डेकारेशन मालकाचे लाखोंचे नुकसानझाले. लग्न कार्यक्रमांचे तीनतेरा वाजले. पांजरा बोरी शिवारातील कृषी सोलरपंप उखडून पॅनल तुटल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

शेतकº्यांवर मोठे संकट कोसळले आहे. शेतशिवारांसह गावातील झाडे उन्मळली. झाडे रस्त्यावर कोसळल्याने रस्ते बंद पडले होते. विद्युत तारा तुटल्याने महावितरण कंपनीचे लाखोंचे नुकसान झाले. संपूर्ण करडी, पालोरा परिसरात रात्रभर अंधाराचे साम्राज्य पसरले होते. घरांवर झाडे कोसळल्याने घरातील साहित्यांची नासधूस झाली. करडी, पालोरा परिसरात झालेल्या नुकसानीची जिल्हाधिकाºयांनी पाहणी करावी व तहसीलदारांना पंचनाम्याचे आदेश द्यावे. तत्काळ नुकसान भरपाईसाठी उपाययोजना आखाव्यात. तलाठ्यांनी पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे पाठवावा, तातडीने नुकसान भरपाईचे वितरण करण्यात यावे, अशी मागणी परीसरातील नागरीकांकडून होत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.