धिरेंद्र शास्त्री महाराजांचे प्रवचन बंद करून त्यांना अटक करा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : परमात्मा एक सेवकांनी मोहाडी व तुमसर पोलीस ठाण्यात निवेदनाचा माध्यमातून बागेश्वर धाम धिरेंद्र शास्त्री ला अटक करून सुरु असले प्रवचनाचे कार्यक्रम बंद करण्याची मांगणी केली. मोहाडी येथे दिनांक २८ मार्च २०२४ पासून बागेश्वर धाम धिरेंद्र शास्त्री यांची धार्मिक प्रवचनाचे कार्यक्रम सुरु आहे.परंतु दिनांक २८ मार्च रोजी सायंकाळी प्रवचनाच्या माध्यमातून आमचे गुरू बाबा जुमदेवजी यांच्याबद्दल अपशब्दाचा वापर करून अपमान करण्यात आले यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी मानव धर्माची स्थापना केली व त्या माध्यमातून गोर-गरीब दु:खी कष्टीमानवाला व समाजाला व्यसनमुक्ती आणि अंधश्रद्धे पासून मुक्त करण्याचे कार्य केले. धर्म आणि भक्तीचा मार्ग दाखवणारे महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या कार्यावर प्रवचणाद्वारे आक्षेपार्ह टिपणी केल्याने सेवकांच्या धार्मिक भावना दुखावल्या असुन हा प्रकार म्हणजे समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा आहे.

या विरोधात ३० मार्च रोजी रात्रीला तुमसर मोहाडी तालुक्यातील परमात्मा एक सेवकांनी एकत्रित येऊन तुमसर व मोहाडी पोलीस ठाणे गाठत निवेदनाच्या माध्यमातून धिरेंद्रशास्त्री ने मीडिया प्रसार च्या माध्यमातून आमचे गुरु महान त्यागी बाबा जुमदेवजी यांची माफी मागावी व प्रवचन बंद करून पोलीस प्रशासनांनी गुन्हा दाखल करावा अशी मांगणी करण्यात आली. आज दिनांक ३१ मार्च रोजी परमात्मा एक तुमसर मोहाडी तालुक्यातील सेवक सेविकांची मोहाडी पोलीस ठाणे समोर प्रचंड गर्दी केली होती. दरम्यान महिला परमात्मा एक सेविकांवर पोलिसांकडुन बल प्रयोग करण्यात आले. मोहाडी पोलिसांनी तक्रारकर्ते सुरजलाल प्रेमलाल अंबुले परमात्मा एक मंडळ नागपूर सचिव रा. परमात्मा एक नगर गोंदिया यांचा तक्रारी वरून धिरेंद्र शास्त्री महाराज यांचा वर २९५अ कलम द्वारे गुन्हा नोंद केला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *