जांभळी तेली नाला ते मुंडिपार सर्व्हीस रोडची दुरुस्ती करा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : राष्ट्रीय महामार्ग जांभळी तेली नाला ते मूंडिपार वरिल सर्वीस रोडची व्यवस्था दुरुस्त करुन संभाव्य मोठे अपघात टाळण्यासाठी शहर काँग्रेस कमिटी च्या वतीने तहसीलदार साकोली मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या राष्ट्रीय महामार्गावरून हजारोंच्या संख्येत मुंबई ते कलकत्ता येथे जड वाहनांची वाहतूक सुरू असते. त्यानुसार गुणवत्ता पूर्ण पर्यायी व्यवस्था म्हणून रोडची निर्मिती न केल्याने जागोजागी रस्त्याची दुर्दशा झालेली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र.५३ वरिल ग्राम जांभळी ते मुंडीपार सडक येथे निमार्णाधीन उड्डाण पुलाच्या बांधकाम मध्ये अनेक अनियमित्ता असल्याने महामार्गा वरिल वाहतुक प्रभावित होत आहे. राष्ट्रिय महामार्ग प्राधिकरणाच्या दुर्लक्षित धोरणाचा फटका वाहतुकदाराना बसत आहे. तर काही दिवसापूर्वी उड्डाण पुलाची निमार्णाधीन भिंत एका बाजूने कोसळल्याने उड्डाण पुलाच्या निर्माण कार्याच्या गुणवत्तेवर प्रश्न निर्माण होत आहेत. यासंदर्भात काँग्रेस कमिटीच्या वतीने चौकशीची मागणी करण्यात आली आहे. उड्डाण पुल निर्माण कार्यात महामार्गावरिल वाहतुक करिता सर्वीस रोडची पर्यायी व्यवस्था गुणवत्ता पूर्ण न केल्याने दररोज वाहतुक प्रभावित होत आहे.

सर्वीस रोडवर मोठे खड्डे पडले आहे. उड्डाण पुलाच्या निर्माण कार्यात डष्ट व मातिचा वापर केल्याने सर्वीस रोडवर चिखल झालेला आहे. पावसाळ्यात पावसामुळे सर्वीस रोडच्या कडेला चिकन मातिचा चिखल झाल्याने दुचाकी चालकांचा व मोठ्या वाहनांचा अपघात होउन गंभीर दुखापत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच दररोज वाहतुक प्रभावित होत असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने गंभिर रुग्णाच्या रुग्णवाहिका तसेच अत्यावश्यक कामासाठी जाणारे येणारे नागरिकांना, कर्मचारी, रुग्णांना व विद्यार्थ्यांना कमालीचा त्रास होत आहे. तरी संभाव्य अपघातजन्य धोका, जिवितहानी टाळण्यासाठी व महामार्गावरिल वाहतुक सुरळित करण्याकरिता त्वरीत सर्वीस रोडची दुरुस्ती करण्याची मागणी चे निवेदनं साकोली शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष दिलिप मासुरकर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी शहर काँग्रेस कमिटी शिष्ट मंडळांत विनायक देशमुख, दर्यावर डोंगरे, प्रमोद मडावी, विजय साखरे, दिलिप निनावे, सतिश रंगारी, कृष्णा हुकरे, विशाल गजभीये, दीपक थानथराटे, कुलदीप नंदेश्वर, जयश्री भानारकर, माधुरी राशेकर, रेखा कुथे,भुमेश्वर निंबेकर, सुशील पुश्तोडे, सोनू बैरागी, सचिन राऊत, आकाश मेश्राम, रविंद्र पंचाभाई, राजेश जुगनाके, राहुल राऊत, जयगोपल लन्जे, शेखर कांबळेसह कांग्रेसचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.