संतांच्या विचारांची प्रेरणा घेऊन समाज समृद्ध करा – डॉ. ब्रम्हानंद करंजेकर

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : माणूस हा समाजशिल प्राणी आहे. माणूस समाजाशिवाय जगू शकत नाही. प्रत्येक माणसाचे मानसिक धैर्य प्रबल व स्थिर असले पाहिजे. माणूस जीवन जगत असतानी समाजासाठी कार्य करणे हे अतिशय प्रेरणादायी ठरत असते. माणसाला माणसातला देव शोधण्याची प्रेरणा समाज बांधवाकडून मिळत असते. समाजातील मुले-मुली यांची शिक्षणाची गती वाढली पाहिजे. त्यासाठी पालकांनी विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. सामाजिक प्रगतीसाठी शैक्षणिक प्रगती अत्यंत महत्वाची असते. श्री संत जगनाडे महाराजांचा इतिहास वैभवशाली आहे. त्यांच्या विचारांची प्रेरणा घ्या. समाज समृद्ध करा, ज्यामुळे राष्ट्रहित साधता येईल.

राष्ट्राच्या प्रगतीत समाजाचा वाटा महत्वाचा असतो. समाज सामाजिकरित्या संघटीत झाला पाहिजे, संत शिरोमणी, संत जगनाडे महाराज यांच्या विचारांची समाजाला अत्यंत गरज आहे. विद्यार्थ्यांनी समाज, धर्म व राष्ट्र, संस्कृतीच्या रक्षणासाठी जगन्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरच समाजातील प्रत्येक माणूस आदर्श जीवन जगेल. जीवनात आलेल्या संकटांना खचून न जाता, संकटावर मात करून नवा इतिहास घडला पाहिजे, असे प्रतिपादन शिक्षण महर्षी डॉ. ब्रम्हानंद करंजेकर यांनी साकोली येथील संताजी महोत्सव प्रसंगी केले.

श्री संताजी तेली समाज संस्था, साकोलीच्या सांस्कृतिक भवनात आयोजित संताजी महोत्सवाच्या उद्घाटनपर भाषणातून उपस्थित समाजबांधवांना मार्गदर्शन करत होते. त्याचवेळी साकोली तालुक्यातील तेली समाजातीलगुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच वयोवृद्ध व्यक्तींचा देखील सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अनिल चांदेवार यवतमाळ हे होते. तर कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. ब्रम्हानंद बाजीराव करंजेकर यांचेहस्ते करण्यात आले.

प्रमुख अतिथी जि.प. अध्यक्ष भंडारा गंगाधर जिभकाटे, वैनगंगा बहुउद्देशिय विकास संस्था अध्यक्ष डॉ. सोमदत्त ब्रम्हानंद करंजेकर, आ. अभिजीत वंजारी, नागपुर पदविधर महासंघ लक्ष्मी सावरकर प्रदेश महिला सचिव राष्ट्रवादी काँग्रेस नागपुर जिल्हा महामंत्री भाजपा संजय कुंभलकर, महिला जिल्हाअध्यक्ष राकाँ भंडारा सरिता मदनकर, पं.स. सदस्या सरीता करंजेकर, वृंदा करंजेकर, रामु शहारे, प्राचार्य अनिल चांदेवार, रेखा भाजीपाले, माजी सभापती भंडारा-साकोली तेली समाज संस्था अध्यक्ष राधेश्याम खोब्रागडे, सचिव हेमकृष्ण वाडीभस्मे व उपाध्यक्ष संजय साठवणे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हेमकृष्ण वाडीभस्मे यांनी केले. संचालन मंडळाच्या संचालिका रजनी करंजेकर यांनी केले तर आभार ताराचंद बडवाईक यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी सर्व तेली समाज संचालक मंडळ साकोली सहसचिव रविंद्र हटवार, सर्व संचालक नरेंद्र वाडीभस्मे, शरद हटवार, डॉ. रूपेश बडवाईक, रामु लांजेवार, ताराचंद बडवाईक, जागेश्वर बडवाईक, रेखा भाजीपाले, जया भुरे, रजनी करंजेकर, ममता झिंगरे व सर्व तालुक्यातील तेली समाज संस्था अध्यक्ष व समाज बांधवांनी सहकार्य केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *