मराठी पत्रकार परिषद पत्रकारांसाठी एक कोटींचा निधी उभारणार

यशवंत थोटे मोहाडी : कोरोना काळानंतर अनेक पत्रकारांच्या नोकºया गेल्या आहेत. तसेच कोरोनानंतर पत्रकारांची आर्थिक परिस्थिती चिंतनाचा विषय झाला आहे. आरोग्यासह इतर प्रश्नांसाठी अनेकदा पत्रकारांना मदतीची गरज भासते. अशावेळी प्रत्येकवेळी आपण पत्रकारांना मदत करू शकू, अशी परिस्थिती नसते. त्यामुळे आता पत्रकारांनी स्वत:साठी काही तरी करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यानुसार आता लवकरच गरजवंत पत्रकारांसाठी पत्रकारांकडून मदत निधी उभारण्याचा अनोखा उपक्रम मराठी पत्रकार परिषदेच्या मार्फत हाती घेण्यात येणार आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून मराठी पत्रकार परिषद पत्रकारांसाठी एक कोटींचा निधी उभारणार आहे, अशी घोषणा मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी केली आहे. याप्रसंगी परिषदेचे मुख्य विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, राज्य सरचिटणीस मन्सुरभाई शेख, पुणे विभागीय सचिव नाना कांबळे, भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम, कार्यकारीणी सदस्य व जिल्हा प्रसिध्दी प्रमुख प्रा.बबन मेश्राम, दैनिक भंडारा पत्रिकाचे यशवंत थोटे, मोहाडी तालुका उपाध्यक्ष नितीन लिल्हारे आदींची उपस्थित होती. याप्रसंगी राज्य सरकारच्या अधिस्विकृती समितीवर नियुक्त झालेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या १६ सदस्यांचा, तसेच मराठी पत्रकार परिषदेचे विविध मेळावे, उपक्रम यशस्वी करणाºया जिल्हा संघांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

राज्य अधिस्वीकृती समितीवर मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, राज्य उपाध्यक्ष शिवराज काटकर, महिला उपाध्यक्षा जान्हवी पाटील, संजय पितळे (ठाणे) आदींचा समावेश आहे. तसेच कार्यक्रमाला मुंबई, पुणे, गडचिरोली, भंडारा, नागपूर, धुळे, अमरावती, बीड, लातूर, जळगाव, जालना, परभणी, नगर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, यवतमाळ, ठाणे, सोलापूर, कोल्हापूर, जळगाव, औरंगाबाद, उस्मानाबाद, नांदेड यासह ३६ जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. राज्यभरामध्ये कोणत्याही पत्रकाराला अडचणीच्या काळात जेव्हा मदतीची गरज भासते, तेव्हा प्रत्येकवेळी मराठी पत्रकार परिषद स्वत: पुढाकार घेत त्याला मदत करण्याचा प्रयत्न करीत असते.

पत्रकारांसाठी असलेल्या पेन्शन योजनेचा लाभ हा महाराष्ट्रातील जास्तीतजास्त पत्रकारांना मिळावा, यासाठी परिषदचे पदाधिकारी प्रयत्न करीतच असतात. पण त्यापेक्षाही आता पत्रकारांनी स्वत:साठी काही तरी करण्याची गरज निर्माण झाली असून त्यामधूनच ‘पत्रकारांसाठी मदत निधी’ उपक्रम सुरू करण्यात येत आहे, असे सांगून एस.एम.देशमुख पुढे म्हणाले, पत्रकारांसाठी उभारण्यात येणाºया या मदत निधीमध्ये आपण मराठी पत्रकार परिषदेसंबंधी असलेल्या प्रत्येक पत्रकाराला एक हजार रुपये निधी देण्याची विनंती करणार आहोत. हा निधी आॅनलाइन स्वरुपात थेट अकाउंटमध्ये जमा करण्याबाबत नियोजन करण्यात येत आहे. अशा निधीतून किमान एक करोड रुपये जमा करण्यात येतील, व त्यामाध्यमातून वषार्ला मिळणाºया ७ ते ८ लाख रुपये व्याजातून किमान २० ते २५ पत्रकारांना मदत करण्याचे नियोजन आहे. या उपक्रमासाठी मराठी पत्रकार परिषद स्वत: पाच लाख रुपये जमा करीत आहे. बीड जिल्हा पत्रकार संघाने सुद्धा एक लाख रुपये जमा करण्याची तयारी दाखवली आहे. मी स्वत: अकरा हजार रुपये देणार आहे.

प्रत्येक जिल्हा संघाने किमान ३ लाख रुपये व तालुका संघांनी किमान १ लाख रुपये जमा करावेत, अशी अपेक्षा आहे. हे पैसे जमा झाल्यानंतर त्यासंबंधीचे व्यवहार अतिशय पारदर्शी राहतील. एका क्लिकवर सर्वांना मदत निधीबाबत माहिती मिळेल, यादृष्टीने ही योजना राबवण्यात येणार असून त्यासाठी लवकरच एक तज्ज्ञ कमिटी नियुक्ती केली जाणार आहे. विशेष म्हणजे जे पत्रकार एक हजार रुपयांचा मदत निधी देतील, त्यांनाच या निधीमधून मदत दिली जाणार आहे. प्रत्येक पत्रकाराला वाटले पाहिजे की, हा आपल्या हक्काचा पैसा आहे, त्यामुळेच या योजनेत प्रत्येक पत्रकाराला सहभागी होता यावे, यादृष्टीने तिचे नियोजन करण्यात आले आहे, असेही देशमुख म्हणाले. आगामी काळात पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती अधिक सक्षम करण्याची गरज आहे. सध्या मराठी पत्रकार परिषदेचा डिजिटल मिडिया विभाग सुद्धा चांगले काम करीत आहे. या माध्यमातून १६ जिल्ह्यामध्ये डिजिटल मिडियाच्या शाखा सुरू करण्यात आल्या आहेत. डिजिटल मिडियाचे राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे त्यासाठी प्रयत्नशीलआहेत.

आगामी काळात डिजिटल मिडियाला सोबत घेऊनच आपल्याला काम करावे लागणार आहे, असेही ते देशमुख यांनी सांगितले. मुख्य विश्वस्त किरण नाईक म्हणाले, मराठी पत्रकार परिषद ही संघटना मजबूत करण्यासाठी प्रत्येक दोन ते तीन महिन्यात बैठक घेण्याची गरज आहे. परिषदेची चळवळ ही महाराष्ट्रभर वाढवण्यावर आगामी काळात भर देण्याची गरज असून त्यासाठी प्रत्येक पदाधिकाºयाने प्रयत्न करावेत. जिल्हा व तालुका संघ हे सक्षम करावे लागणार असून त्यादृष्टीने काम सुरू करावे. परिषदेच्या राज्य कार्यकारिणीकडून जे काही उपक्रम राबवण्यात येतील, ज्या काही सूचना जिल्हा व तालुका पातळीला येतील, त्या सूचनांची, उपक्रमांची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर करावी. त्यासाठी प्रत्येक पदाधिकाºयाने पुढाकार घ्यावा. पत्रकारांनी संघटीत झाल्यानंतर त्यांची ताकद खूपच मोठी असते, हे नेहमी दिसून आले आहे. तुम्ही संघटीत राहा, आम्ही २४ तास तुमच्या सोबत आहोत. तुमच्या मदतीसाठी पुढाकार घेऊ, अशी ग्वाही नाईक यांनी दिली. कार्याध्यक्ष

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *