मतीमंद व अपंग असलेल्या अल्पवयीन मुलीवर केला नराधम अभियंत्याने अतिप्रसंग

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : मतिमंद व अपंग असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर गावातीलच इंजिनिअर झालेल्या एका पांचेविस वर्षीय तरुणाने अतिप्रसंग केल्याची घटना दिनांक १६ जुलै रोजी लाखांदूर तालुक्यातील दहेगाव येथे उघडकीस आली. आशिष मोरेश्वर वरठे असे आरोपीचे नाव असून घटनेतील आरोपीला दिघोरी/ मोठी पोलिसांनी अटक केली आहे. लाखांदूर तालुक्यातील दहेगाव येथील आशिष मोरेश्वर वरठे वय २५ वर्ष या इंजीनियरिंग चे शिक्षण घेणाºया तरुणाने गावातीलच एका पंधरा वर्षीय मतिमंद व अपंग असलेल्या मुलीवर अतिप्रसंग केल्याची घटना दिनांक १६ जुलै रोजी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान घडली. मतिमंद मुलगी घरात एकटीच असल्याच्या संधी साधून आरोपीने घरात घुसून अतिप्रसंग केला आहे.

घटनेची माहिती दिघोरी पोलिसांना कळतात सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पवार यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला ताब्यात घेतलेला आहे. पीडित मुलगी व आरोपीचे लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून दिघोरी पोलिसांनी आरोपी आशिष मोरेश्वर वरठे याच्या विरोधात पोक्सो सहित विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद करून अटक केली आह.े पुढील तपास दिघोरी पोलीस करीत आहे. एका मतिमंद अल्पवयीन मुलीवर मध्य धुंद अवस्थेत असलेल्या एका सुशिक्षित इंजिनिअरने अत्याचार केल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा सर्वत्र निषेध केला जात आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *