साकोली तालुक्यात कही खुशी-कही गम

साकोली : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आज झालेल्या मतमोजणी नंतर आलेल्या निकालात संमिश्र परिणाम आले असून मतदारांनी अनपेक्षित निकाल दिल्याने सरपंच पदासाठी बाशिंग बांधलेल्या उमेदवारांचा हिरमोड झाला. असे असले तरी प्रत्येक राजकीय पक्ष निवडून आलेला सरपंच आपल्याच पक्षाचा असल्याचा राजकीय पुढारी दावा करीत आहेत. या निवडणुकीमध्ये माजी पंचायत समिती सभापती माजी जिल्हा परिषद सदस्य अशा काही उमेदवारांनी सुद्धा सरपंच पदाच्या निवडणूकीत भाग घेऊन मजल मारली आहे. अधिकतर सरपंच हे काँग्रेस समर्थित पक्षाचे निवडून आले आहेत. तर भाजपा समर्थित सरपंचांची संख्या दुसºया क्रमांकावर आहेत ग्रामपंचायत पंचायत सरपंच पदी ग्रामनिहाय पिंडकेपार नंदकुमार ब्रिजलाल समरीत , एकोडी संजय खोब्रागडे, मोखे किह्नी घनश्याम पारधी, सातलवाडा अंजना मेश्राम, वडेगाव माधुरी गहाणे, पाथरी पूजा देशमुख, मालूटोला राजेश मरसकोल्हे, किह्नी (एकोडी) शोभा मोहुले , बामपेवाडा नंदेशीनी मेश्राम, खांबा/ जांभळी उषा खंडाते, बोदरा ललिता कापगते,मुंडीपार /सडक मनोरमा हुमने ,सावरबंध. माधवी बडवाईक, (भाजपा ) , परसोडी.. जयश्री पर्वते ,बरडकिन्ही.. शिशुपाल सलामे ,केसलवाडा.. खोब्रागडे नीलिमा, झाडगाव ..भास्कर खंडाईत ,खंडाळा.. अनिल गडपायले, बोंडे .. अश्विनी बावनकुळे ,जांभळी सडक ..विशाल नंदुरकर , गुढरी.. लता रामटेके,सोनपुरी ..घनश्याम कठाने, सानगडी ..सविता उपरीकर ,सानगाव ..निवृती मोहनकर, लवारी ..नरेश नगरीकर (काँग्रेस) माजी पंचायत समिती सभापती ,कुंभली उमेद गोडसे माजी जिल्हा परिषद सदस्य, वळद भारती बडवाईक, सासरा योगराज गोटेफोडे, विहिरगाव दयावती उपरीकर, सालेबर्डी शीला रामटेके,महालगाव नंदकिशोर कावळे, पळसगाव प्रकाश बागडे, सुकडी राजेश भेंडारकर, तुळमापुरी नरेश राऊत, मोहघाटा चंदना बोरकर,गीरोला जयशीला कापगते, उमरी यशवंत कापगते, पापडा कुंदा मुंगमोडे , निलज जागृती गहाणे, गोंडोउमरी पौर्णिमा चांदेवार, वांगी मनोज शहारे. या निवडणुकीत काँग्रेस समर्थित २०, भाजपा-समर्थीत १४ , अपक्ष ६ ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समर्थित एक सरपंच निवडून आल्याची माहिती आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *