पहिलीत दाखलपात्र मुलांची शाळापूर्व तयारी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मोहाडी : जागतीक बँक पुरस्कृत रळअफर उपक्रमाअंतर्गत राज्यातील जि.प.शाळांमधील इ. पहिलीत दाखलपात्र मुलांची शाळापूर्व तयारी अधिक चांगल्या प्रकारे व्हावी म्हणून शाळापूर्व तयारी मेळावा- पहिले पाऊल हा उपक्रम संपूर्ण राज्यामध्ये राबविला जात आहे. त्या अंतर्गत जि.प. प्राथमिक शाळा चिचाळ येते कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सातही स्टॉलवर विद्यार्थ्यांकडून कृती करून घेण्यात आल्या.

कार्यक्रमाचे अध्यक्ष चुन्नीलाल लांजेवार, उद्घघाटक सविता बिलवणे, पं.स.सदस्य वाघधरे सर्व शाळा समिती सदस्य व मुख्याध्यापिका अणेराव, भाकरे, केंद्रप्रमुख चिचाळ उपस्थित होते. शाळापूर्व तयारी मेळाव्याच्या यशस्वीतेकरिता शाळेतील सर्व शिक्षकवृंद निशा धांडे, निलकंठ डेकाटे, महेश जांभुळे, दर्शना मरघडे तसेच सर्व आंगणवाडी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगला गणवीर तर आभार प्रदर्शन मीनाक्षी फंदे यांनी केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *