धावत्या रेल्वेत चढताना अपघात, तरुणाचा एक हात व पाय निकामी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : गोंडवाना एक्स्प्रेस धावत्या प्रवासी रेल्वेत चढताना प्रवासी युवकाला कायमचे अपंगत्व आल्याची घटना तुमसर रोड देव्हाडी जंक्शनवर घडली. सदर अपघात सोमवारी दुपारी १२:३० वाजता घडला. त्यात एक हात व पाय गमावलेल्या जखमी युवकाचे नाव शुभम रवी शहारे (२५, रा. कुळवा, गोंदिया) असे आहे. जखमीला तुमसर उपजिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र, परिस्थिती बघता शुभमला गोंदिया येथे हलविण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. तुमसर रोड हे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महत्त्वाचे जंक्शन आहे. या ठिकाणी जवळपास सर्वच एक्स्प्रेसला थांबा असल्याने प्रवाशांनी तथा प्लॅटफॉर्मवर छोट्या दुकानांची चांगलीच गर्दी दिसून येते. त्यातच ३ जुलैच्या दिवशी फलाट क्रमांक तीनवर गोंडवाना एक्स्प्रेस थांबली.

दरम्यान, गोंदियाहून गाडीने शुभम शहारे नागपूरकरिता निघालेला शुभम देव्हाडी येथे पाणी पिण्याकरिता गाडीतून उतरला. मात्र, पैशाच्या देवघेवीत उशीर झाल्याने गाडी सुटली. मध्यम गती असलेल्या गोंडवाना एक्स्प्रेसला पकडण्याच्या नादात शुभम चुकला. त्यात त्याचा तोल जाऊन तो फलाट व गाडीच्या मधात दाबल्या गेला. गाडीला थांबविण्यात आले. तोपर्यंत शुभमचे एक हात व पाय अक्षरश: तुटून पडले. तीच सीआरपीएफने धाव घेऊन जखमीला बाहेर काढले. रेल्वे नियमानुसार घटनेची नोंद घेऊन वैद्यकीय उपचारांसाठी तत्काळ हलविण्यात आले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *