जिल्हा परिषदची शाळा सलाईनवर! विद्यार्थी शाळा सोडण्याच्या मनस्थितीत

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : कोढा केंद्रातील मौजा सोमनाळा.बूज येथिल जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थाचे शिक्षकांअभावी शैक्षणिक वर्ष धोक्यात आले आहे. शाळेला पटसंख्येचे निकषानुसार लवकरात लवकर शिक्षक उपलब्ध करून देण्यात यावे अन्यथा शाळेला टाळा ठोकण्यात येईल असा ईशाराच संतप्त पालक व शाळा व्यवस्थापन समितीने गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सोमनाळा बुज येथे १ ते ७ पर्यत वर्ग असून आज रोजी एकूण १०६ विद्यार्थी पटावर आहेत. मागील सत्र वर्ष २०२२ – २३ मध्ये ४ शिक्षक व करार पध्दतीवर नियुक्त १ असे एकूण ५ शिक्षक कार्यरत होते. नुकताच झालेल्या आंतरजिल्हा बदलीत शाळेतील ३ शिक्षक बदली होऊन गेल्यानंतर त्यांचे ठिकाणी फक्त एकच शिक्षक नव्याने रूजू झाले असून १ ते ७ वर्ग असलेल्या शाळेत सध्या फक्त दोनच शिक्षक कार्यरत आहेत.

एकंदरीत शाळा सलाईनवर सुरू असून परिस्थिती चिंताजनक आहे. परीणामी शिक्षकांअभावी पाल्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पालक आपल्या मुलांना गावातील जिल्हा परिषद शाळेतून काढून इतर खाजगी शाळेत प्रवेश घेण्याचा विचार करत आहेत. शाळा सुरू होऊन दोन दिवस झाले मात्र दोन दिवसात दाखला काढण्यासाठी अनेक अर्ज प्राप्त झाले असून हे असेच सुरू राहीले तर गावची एकमेव असलेली सरकारी शाळा ओस पडेल आणि गरीबांच्या मुलांना शिक्षण घेणे कठीण होईल या भितीने गावातील सुशिक्षित तरून व पालकांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी संतप्त होत शाळेवर मोर्चाच काढला आणि “शिक्षक नाही तर शाळाच चालूदेणार नाही” अशी भुमिका घेतली. त्यावेळी शाळा व्यवस्थापनसमितीने मध्यस्थी करत लवकरच आवश्यक शिक्षक उपलब्ध केले जातील असा शब्द देत पालकांची समजूत काढली व असे झाले नाही तर आम्ही स्वत:च शाळेला कुलूप बंद करू व शिक्षक उपलब्ध होईस्तोवर आदोलन करू असा विश्वास दिला. नंतर शाळेतील विद्यार्थाचे शिक्षकांअभावी शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी पटसंखेच्या निकषानुसार लवकरात लवकर शिक्षक उपलब्ध करून देण्यात यावे अन्यथा शाळेला टाळा ठोकण्यात येईल असा ईशारा संतप्त पालक व शाळा व्यवस्थापन समितीने गटविकास अधिकारी यांना निवेदनाव्दारे केला आहे.

एकीकडे भयंकर बेरोजगारी व डि.एड, बि.एड केलेल्या तरूणाचे नौकरीचे वय निघुन चालले जात असताना दुसरीकडे शिक्षकांअभावी सरकारी शाळा ओस पडत चालल्या आहेत याला काय अर्थ हा सोमनाळा.बूज येथिल एकाच शाळेचा प्रश्न नसून सरकारने लवकरात लवकर शिक्षक भरती करून यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा.

दिगांबर कुंडलिक वंजारी सदस्य-शाळा व्यवस्थापन समिती सोमनाळा\बु.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *