राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोहाडीत पडली पहिली खिंडार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मोहाडी:विदर्भाच्या पूर्व टोकावर असलेल्या भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथील सुप्रसिद्ध जागृत माँ चोंडेस्वरी देवीच्या पावनभूमीत राष्ट्रवादी पक्ष एक असताना पहिली ठिणगी मोहाडी तालुक्यात पडली आहे.राष्ट्रवादी पक्षाचा पहिला गट जेष्ठ मार्गदर्शक शरदचंद्र पवार यांच्यासोबत आला. मोहाडी येथील शासकीय विश्रामगृहात जेष्ठ मार्गदर्शक शरदचंद्र पवार गटाची सभा बुधवार दि. ५ जुलै २०२३ ला सायंकाळी ६ वाजता घेण्यात आली.माजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष वासुदेव बांते करडी, माजी जिल्हा परिषद सदस्य किरण अतकरी जांब, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल काळे मोहंगावदेवी, माजी पंचायत समिती सदस्य केशवराव बांते, माजी युवक तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष श्याम कांबळे, आंधळगाव जिल्हा परिषद प्रमुख प्रदीप बुराडे,माजी जिल्हा युवक राष्ट्रवादी कॉंग्रेस सचिव शकील आंबागडे,माजी पंचायत समिती सदस्य भगवान सिंगनजुडे,ईश्वर माटे, देवानंद चौधरी, विजय बारई, लोकेश सारवे, अशोक कांबळे, बळवंत नारायण शेंडे, अविनाश डोये,श्रीपाद डोये,नरेश चव्हाण, जितेंद्र सुरेश बडवाईक आंधळगाव, महादेव बांते शिवनी, शामराव ठाकरे बोंदरी,सुशील रतनलाल बोपचे, ज्ञानेश्वर कुकडे,पत्रिकाशी बोलताना स्पष्ट केले की, आम्ही इतके वर्ष भाजपा विरोधात जावून लढलो त्यांच्यासोबत हातमिळवणी केली. ती आम्हाला पटणारी नाही. म्हणून आम्ही जेष्ठ नेते मार्गदर्शक शरद पवार यांच्या पाठीशी आहोत.

आमच्या सोबत मोहाडी तालुक्यातील तीन जिल्हा परिषद सदस्य गोविंदा आगासे, आशिष डोये सकरला, नरेंद्र बडवाईक,प्रफुल्ल धुमनखेडे, विनोद वैद्य,मुरलीधर ढबाले महालगाव, कृष्णा रामचंद्र आगाशे, विलास बुधे, ईस्वर माटे,विशाल झंझाड,विजय बारई, दादाराम भोयर,अनमोल साखरे,विजय सेलोकर,देवानंद चौधरी आदी ६१ कार्यकर्ते हजर होते. २०१९ ला झालेल्या विधानसभेच्या निवडणूकीनंतर राष्ट्रवादी पक्षाला चांगले दिवस आले.पण,एका वषार्नंतर अनेक राष्ट्रवादी पक्षातील कार्यकर्त्यांचा भ्रमनिराश झाला.कार्यकर्त्यांमध्ये काही नेत्यांच्या विरोधात खदखद दिसून येत होती.पक्ष फुटीनंतर ती खदखद बाहेर आली.या सभेत किरण अतकरी,वासुदेव बांते,अनिल काळे,केशव बांते यांनी आपल्या नेत्यासंबधीत मनातील भावना व्यक्त केल्या.यानंतर किरण अतकरी, वासुदेव बांते यांनी दैनिक भंडारा आहेत असे सांगून आमचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल व जिल्ह्याचे अध्यक्ष नाना पंचबुधे यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले. आम्ही मूळ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात आहोत.

गुरुवार दि.६ जुलै २०२३ ला दुपारी १ वाजता भंडारा येथे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची सभा शासकीय विश्रामगृहात बोलावली आहे. येत्या चार दिवसानंतर काय निर्णय होते यावर आम्ही आपली पुढची भूमिका ठरवू असे वासुदेव बांते व किरण अतकरी यांनी दैनिक भंडारा पत्रिकाला सांगितले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *