एसटी बसवर दगडफेक, काचा फुटल्या

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : येथील मुख्य बस स्थानकावर एका तरुणाने दगडफेक करून एसटी बसची काच फोडल्याचा प्रकार घडला. सुदैवाने यात कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही. पवनी आगाराची बस क्रमांक एमएच ०७/सी ९४४३ ही भंडारा बसस्थानकावरून प्रवासी घेवून पवनीकडे जाण्याकरिता निघाली होती. दरम्यान नशेत धूंद असलेल्या एका तरुणाने बस थांबविली. यावेळी बसमधे जागा नसल्याने वाहकाने त्याला मागच्या बसने येण्यास सांगितले.

मात्र या तरुणाने बसचा पाठलाग करीत बस स्थानकाच्या प्रवेशद्वाराबाहेर बसवर दगडफेक केली. त्यामुळे सदर बसची मागची काच फुटली. सुदैवाने प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही. काच फुटताच चालकाने बस थांबवून तरुणाला पकडून बसस्थानक व्यवस्थापकाच्या ताब्यात दिले. यानंतर बस पवनीच्या दिशेने रवाना होताच व्यवस्थापकाने पोलिसांकडे तक्रार न करता सदर तरुणाला समज देवून सोडून दिल्याचे समजते. हा तरुण अंमली पदार्थांचे सेवन करून असल्याचे व एसटी कर्मचा-यांना जीवे मारण्याची धमकी असल्याचे प्रवाशांकडून सांगितले जात होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *