तीन दिवसीय संपात सहभागी होण्याचे आवाहन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी सिहोरा : महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी कामगार सेना एन.जी.पी. ५८२५ चे (संलग्न कामगार सेना) वतीने ग्रामपंचायत कर्मचाºयांचा जिल्हा मेळावा काल २४ फेब्रुवारी रोजी राज्याध्यक्ष विलास कुमरवार यांचे अध्यक्षतेखाली तर जनार्धन मुळे राज्य कार्याध्यक्ष यांचे प्रमुख उपस्थितीत संताजी मंगल कार्यालय लाखनी येथे संपन्न झाला. या जिल्हा मेळाव्याचे उद्घाटन गंगाधर जिभकाटे अध्यक्ष जिल्हा परिषद भंडारा यांचे हस्ते ज्योत प्रज्वलित करून करण्यात आले. या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून गट विकास अधिकारी पंचायत समिती लाखनी, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष ईटवले, शिवसेना जिल्हा संघटक लवकुश निर्वाण, लाखनी कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष गिरीपुंजे, विभागीय अध्यक्ष सुरेश हिंगे, गोंदिया जिल्हाध्यक्ष मनोहर मेश्राम, राज्य प्रसिद्धी प्रमुख गणेश कोहळे, जिल्हाध्यक्ष मारुती चेटुले, जिल्हा कार्याध्यक्ष रामलाल बिसेन, विभागीय अध्यक्ष हेमराज वाघाडे सर्व तालुका अध्यक्ष व सचिव उपस्थित होते. ज्या ग्रामपंचायती ग्राम पंचायत कर्मचाºयांना ५०% रक्कम देण्यास असमर्थ असतील त्यांनी आम्ही देऊ शकत नाही असा ठराव राज्य शासनाकडे पाठवावा. तसेच राहणीमान भत्त्याची रक्कम सुद्धा ग्रामपंचायतीनेच द्यावा असे असतांना ग्रामपंचायती देत नाही, वेतनातून कपात झालेली भविष्य निर्वाह निधीची रक्कम कर्मचाºयांचे खात्यात जमा होत नाही अशा ग्राम पंचायतीवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी असे राज्याध्यक्ष विलास कुमरवार आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलतांना म्हणाले.

राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर असलेल्या विविध मागण्या संदर्भात राज्यातील सर्व जिल्हा परिषदेसमोर कामगार सेनेने तीन दिवसीय संपाची हाक लगावली आहे. भंडारा जिल्हा परिषदे समोर २६ ते २९ पर्यंतच्या संपात कर्मचाºयांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा कार्याध्यक्ष रामलाल बिसेन यांनी केले. लाखनीचे खंड विकास अधिकारी यांनी तात्काळ आढावा बैठक घेण्यात येईल असे सांगितले. तर जिल्हा स्तरावरील ग्रामपंचायत कर्मचाºयांच्या तक्रारीची तात्काळ दखल घेण्यात येईल असे जि.प. अध्यक्ष गंगाधर जिभकाटे यांनीआपल्या उद्घाटकीय भाषणात बोलतांनी म्हणाले. सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष ईटवले व शिवसेनेचे जिल्हा संघटक लवकुश निर्वाण यांनी ग्रामपंचायत कर्मचाºयांच्या मागण्या संदर्भात भंडारा जिल्हा परिषदे समोर होणाºया तीन दिवसीय संपला पाठिंबा दिला आहे. ग्रामपंचायत कर्मचाºयांच्या ग्रामपंचायत पातळीवरील मागण्या ग्रामपंचायतीनेच निकाली काढाव्यात तसेच ग्रामपंचायत कर्मचारी सरपंच व सचिव यांनी दुरावा न ठेवता खांद्याला खांद्या लावून गावाच्या विकासाकडे लक्ष द्यावे. काम बंद आंदोलन हे ग्रामपंचायत विरुद्ध नाही शासना विरुद्ध आहे त्यांनी सुद्धा पाठिंबा द्यावा, असेही ईटवले म्हणाले. या मेळाव्यात भंडारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन हेमराज वाघाडे यांनी प्रास्ताविक मारुती चेटुले यांनी तर आभार माणिक लांबट यांनी मानले. या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी लाखनी, पवनी, साकोली, लाखांदूर व तुमसर तालुक्यातील अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिवांनी अथक परिश्रम घेतले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.