गावातून आठ वर्षीय चिमुकली बेपत्ता…?? जंगल व्याप्त पापडा खुर्द गावातील घटना

पोलीस अधीक्षकांकडून शोध मोहीम युद्ध स्तरावर

नाजीम पाशाभाई-साकोली – तालुक्यातील ग्राम पापडा/ खूर्द निवासी एक आठ वर्षीय अल्पवयीन मुलगी दिनांक २८ नोव्हेंबर रोजी संध्याकाळ पासून घराशेजारील परीसरात खेळायला गेली असता रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने गावात खळबळ उडाली आहे. मुलीच्या अचानक बेपत्ता झाल्याने ग्रामीणांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असून परीसरात विभीन्न चर्चेला उधाण आले आहे. पोलीस प्रशासनाला या घटनेची माहिती मिळताच स्वतः पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत आपल्या ताफ्यासह पापडा/ खूर्द गावी पोहचून युध्दस्तरावर शोध मोहीम सुरू केली आहे.

 

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जंगल व्याप्त ग्राम पापडा/ खूर्द निवासी कीशोर सिडाम यांची मुलगी श्रध्दा कीशोर सिडाम वय(8 वर्ष) ही पापडा खुर्द गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये तिसऱ्या वर्गात शिकत होती. ग्रामपंचायतीच्या निवडणुक कार्यक्रमा च्या कारणामुळे सोमवारी शाळेला दुपारी दीड वाजता सुट्टी देण्यात आली होती. श्रद्धा ही संध्याकाळी साडेचार पर्यंत घरी आपल्या बहिणी सोबत होती त्यानंतर साडेचार वाजता श्रद्धा घराबाहेरील परिसरात खेळण्यासाठी नीघाल्याचे सांगण्यात येत आहे. गावात शोधा शोध घेतल्यानंतर रात्री उशिरापर्यंत श्रद्धा घरी न परतल्याने घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला कळविण्यात आली. सदर घटनेची गंभीरता लक्षात घेऊन स्वतः पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी रात्री सुमारे १०.३० वाजता आपल्या ताफ्यासह पापडा खुर्द गाव गाठले व शोध मोहीम सुरू केली याकरिता श्वान पथकही पाचारण करण्यात आले होते. पापडा खुर्द गावाला लागून जंगलव्याप्त परिसर असल्याने हिंसक वन्य प्राण्यांचे वास्तव्य आहे. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये वेगवेगळ्या चर्चेला उधान आले असून चिंतेचे वातावरण पसरले आहे. पोलीस अधीक्षक मतानी गावात ठाम मांडून असून आजही शोध मोहीम व तपासाची चक्रे पोलीस प्रशासनाकडून मोठ्या सक्रियतेने सुरू आहे. ३.३० वाजता बातमी लिहेपर्यंत श्रद्धाचा शोध लागला नसल्याची माहिती आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *