आदर्श हायस्कूल पारडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

भंडारा पत्रिका/वार्ताहर पारडी : आदर्श हायस्कूल पारडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रसंगी अध्यक्ष लाभलेले दलित मित्र म. दा. भोवते संस्थापक दहिवले पंचशील शिक्षण संस्था पारडी प्रामुख्याने उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून दयालभोवते, शिवशंकर चव्हारे सरपंच ग्रामपंचायत पारडी, सौ. गीता शहारे उपसरपंच ग्रामपंचायत पारडी, मनोज हुकरे पोलीस पाटील पारडी, नामदेव आंबेडारे, सौरभ बोरकर, यश निर्वाण, निशिकांत मेश्राम, किशोर चव्हारे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुनील भोवते यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन चरित्रबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थी यांनी सुध्दा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र गडपायले व आभार प्रदर्शन व्हि. एस. शिवरकर यांनी मानले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *