शासकीय इमारत पाडणा-यावर गुन्हा दाखल का झाला नाही?

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : तालुक्यातील जांभोरा (पालोरा) येथे ३० ते ३५ वर्ष आधी बनलेली वन विभागाची इमारत दि.२४ मार्च रोजी जेसीपी लावून पाडण्यात आली. याबाबत २५ मार्च रोजी तक्रार केली. पण अजून तक्रार दाखलच झाली नाही. करीता शासकीय इमारत पाडणाºयावर अजूनपर्यंत गुन्हा दाखल का झाला नाही?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मोहाडी तालुक्यातील जांभोरा (पालोरा) हे गाव जंगल लगत असलेले गाव या गावात ३० ते ३५ वर्षा अगोदर वन विभागाचे कर्मचारी राहण्याकरिता नाका (निवास्थान) बनले. ते निवास स्थान येथील ग्राम पंचायत सदस्य यांनी माझी जागा आहे म्हणून दि.२४ मार्च रोजी पांजरा येथील पिंटू राऊत यांच्या जेसीपीने सायंकाळी पाडण्यात आली. याची तक्रार जांभोरा येथील उपसरपंच यादोराव मुंगमोडे यांनी वन विभागास दिली. त्यामुळे वन रक्षक मोहन हाके यांनी दि.२५ मार्च रोजी पोलीस स्टेशन करडी येथे लेखी तक्रार दिली. त्या नुसार आरोपी यांच्यावर व जेसीपी मालकावर गुन्हा नोंद होणे गरजेचे आहे. पण आजपर्यंत गुन्ह्याची नोंद झाली नसून पोलीस विभाग आरोपी यांना वाचविण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप तक्रारकर्ते यादोराव मुंगमोडे यांनी केला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *