ग्रामीण भागातील खेळाडूंना खेळण्याची संधी- कुरेशी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : वर्षभर विद्यार्थी खेळाच्या माध्यमातून विविध खेळांच्या सराव करीत असतात अशा खेळाडू विद्यार्थ्यांना त्यांच्या वयोगटांनुसार जिल्हा विभाग राज्य व राष्ट्रीय स्पर्धा खेळण्याची सुवर्णसंधी असते. भंडारा जिल्हा वॉलीबॉल असोसिएशन तर्फे महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघटनेच्या निर्देशानुसार विविध वयोगटाचे जिल्हा संघ निवड करून विभागीय स्पर्धेत जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी दिली जाते, असे मत जिल्हा वॉलीबॉल संघटनेचे सचिव शाहेद कुरेशी यांनी तालुका क्रीडा संकुल साकोली च्या मैदानावर आयोजित १६ व १८ वर्षे वयोगटातील मुला-मुलींच्या निवड चाचणी स्पर्धे अंतर्गत व्यक्त केले. या निवड चाचणी स्पर्धेत तुमसर, अड्याळ, सानगडी, मानेगाव बाजार, भंडारा, साकोली, लाखनी येथील खेळाडू मुला मुलींनी सहभाग घेतला. १६ आणि १८ वर्षे वयोगटाचे विभागीय स्पर्धा कळमेश्वर, नागपूर येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. १४ वर्षे व २१ वर्ष विभागीय स्पर्धा गोंदिया येथे आयोजित होणार आहेत. विभागीय स्पर्धेतून महाराष्ट्र राज्याच्या संघ निवड करण्यात येतो, ग्रामीण व शहरी भागात व्हॉलीबॉल हा खेळ खूप मोठ्या प्रमाणात खेळला जातो व खेळाडूंना संघटनेच्या होणाºया विविध स्पर्धांमध्ये भंडारा जिल्ह्याच्या संघाचा सहभाग ही होतो.

वंश लिचडे, वेदांत बाभुळकर, कृष्णा सिंगंजुळे, वेदांत पडोळे, नेहाल धांडे, पुष्कर गिरीपुंजे, तोशिक वघारे, ध्रुव कापगते, हिमांशू रंगारी, आदित्य वैद्य, पवन कांतोडे, तुषार चौरे, चारुदत्त खानोरकर, हेमंत कुंभारे, फालगुण चूटे, सोहम चौधरी, केदार हेमने, पियुष बांगरे, सुधांशू धांडे, सागर चचाने, उत्कर्ष मानकर, आर्यन वालदे, टिकेश मानवटकर तर मुलींच्या संघात हिमानी भुरे, कुमुद बोकडे, साईशा लिचडे, कशिश धकाते, हसीना बावनकुळे, समीक्षा लांजेवार, सिद्धीशा गिरी, रितीशा सावरबांधे, बुशरा हुसेन, खुशी मेश्राम, समीक्षा गजबे, सोमेश्वरी गोटेफोडे, अरुंदता वंजारी यांनी विभागीय स्पर्धेत भंडारा जिल्ह्याचे नेतृत्व केले. निवड झालेल्या संघाचे अध्यक्ष सुनील फुंडे, उपाध्यक्ष विकास राऊत, डॉ. प्रकाश सिंग, सलीम अन्सारी, दीपक रायपुरकर, शैलेंद्र सिंग राजपूत यांनी अभिनंदन केले आहे. निवड चाचणी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वसीम पठाण, अनिकेत नागोसे, संजय सयाम, प्रवीण वंजारी, दीपक देशकर, कु. स्वाती गौतरे, सुनील गजबे यांनी सहकार्य केले. संघ व्यवस्थापक म्हणून वसीम पठाण, सुनील गजबे व कुमारी स्वाती गाऊत्रे, आर्यन टेंभुर्णे यांनी जबाबदारी पार पाडली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *