शिक्षक, कर्मचारी व पालक यांचे एक दिवसीय प्रशिक्षण रेंगेपार येथे संपन्न

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखनी : दत्तोपंत ठेंगडी केंद्रीय श्रमिक शिक्षा एवंम विकास मंत्रालय नागपूर विभाग मार्फत शिक्षक, कर्मचारी व पालक वर्गाकरिता अशोक विद्यालय रेंगेपार/कोठा येथे एक दिवसीय संप्रेषण व संघटन विकास कौशल्य प्रशिक्षण शिबीर वैद्य, विभागीय संचालक नागपूर यांच्या मार्गदर्शनात पार पडले. सदर प्रशिक्षणात संप्रेषण कौशल्य व संघटन कौशल्य या विषयावर प्रशिक्षणार्थींना सखोल मार्गदर्शन करण्यात आले. आपसातील संवाद जर कमी होतगेले तर त्याचा विपरीत परिणाम आपले आरोग्य व इतर सर्व बाबीवर होत असतो, त्यावर कशा प्रकारे मात करून पुढे गेले पाहिजे तसेच संघटन कौशल्याचा वापर करून विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी जाणून त्यांना कशाप्रकारे मार्गदर्शन करता येईल याबाबत प्रशिक्षणात वैद्य यांनी विस्तृत माहिती दिली. यावेळी सुभाष रामटेके यांनी देखील प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. सदर प्रशिक्षणात २० शिक्षक/कर्मचारी व पालकांनी सहभाग घेतला. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रविण गजभिये यांनी प्रशिक्षणाची रूपरेषा समजावून सांगितली तर संचालन मोहन बोंदरे यांनी केले, तसेच सर्व उपस्थितांचे आभार विनोद गिरी यांनी मानले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.