शासकीय तंत्रनिकेतन साकोली येथे स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील शिक्षणावर संभ्रम!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : शासनाच्या सदोष नियोजनामुळे शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयात शिकणाºया विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. स्थापत्य सिविल विभागातील अधिव्याख्यात्यांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक गैरसोय होत आहे. शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयांमध्ये स्थापत्य अधिव्याख्यात्यांची गरज असतांना सर्वकष विचार न करता शासनाने राज्यात वर्ष २०१९ मध्ये यंत्र अभियांत्रिकीच्या १७ अधिव्याख्यात्यांची निवड एमपीएससी च्या माध्यमातून केली. या निवड प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. यामुळे राज्यातील तंत्रनिकेतन विद्यालयातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक दर्जा खालावत आहे. त्याच बरोबर सिव्हिल बांधकाम क्षेत्रातील शासकीय विकास कामांची गुणवत्ता तपासणी चे कार्य यंत्र अभियांत्रिकी अधिव्याख्यात्यांच्या माध्यमातून केली जात असल्याने बांधकाम क्षेत्रातील गुणवत्तेवर प्रश्न निर्माण होत आहेत. हा सगळा प्रकार विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी घातक असल्याने पालक वर्गात चिंतेचे वातावरण आहे. वर्ष २०१७ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून राज्यातील शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयात अधिव्याख्याता निवड प्रक्रियेमध्ये विसंगती असल्याने स्थापत्य सिविल अधिव्याख्यात्यांची मागणीनुसार पदस्थापना झाली नाही.

याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक धोरणावर होत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातीलविद्यार्थ्यांकरीता तंत्रशिक्षणाची उत्तम सेवा प्रदान करणारी व उच्च दर्जाचे शिक्षण देणारी संस्था म्हणून शासकीय तंत्र निकेतन साकोली सर्वदूर प्रसिद्ध आहे. कोरोना प्रादुभार्वाच्या काळानंतर या विद्यालयात सर्व ट्रेड मध्ये क्षमतेनुसार विद्यार्थ्यांची भरती झाली आहे परंतु याच संस्थेत ‘प्रमुख स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील विद्यर्थ्यांच्या भावितव्याशी खेळ करणारी गंभीर बाब पालकांच्या निदर्शनात आली आहे. स्थापत्य अभियांत्रिकी विभागात एकूण ३ अधिव्यख्याता व १ नियमित विभाग! असून, २ अधिव्याख्याता स्थापत्य अभियांत्रिकीशी निगडित उपयोजित यंत्रशास्त्र विभागात कार्यरत आहेत. हे दोन्ही अधिव्यख्यातांचे मूलभूत शिक्षण यंत्र अभियांत्रिकी विषयात झालेले आहे. तंत्रनिकेतनामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे निवड झालेले विविध विद्याशाखेतील उमेदवार अधिव्याख्याता म्हणूनकार्यरत असतात. अभियांत्रिकीच्या विद्यशाखेत अधिव्याख्याता म्हणून निवड होण्या करीता संबंधित विद्यशाखेतील पदवी असणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची किमान शैक्षणिक अहर्ता आहे. असे असताना सुद्धा मागील दोन शैक्षणिक सत्रापासून स्थापत्य अभियांत्रिकी विभागप्रमुखद्वारे यंत्र अभियांत्रिकी (मधल्या अधिव्याख्याताना स्थापत्य अभियांत्रिकीच्या विषय शिकविण्याची जबाबदारी देण्यात येत आहे.

कॉक्रिट टेकनॉलॉजि व ट्रान्स्पोर्टेशन इंजिनेरींग सारखे स्थापत्य अभियांत्रिकीचा गाभा असलेले विषय यंत्र अभियांत्रिकीकेलेल्या अधिव्याख्याताद्वारे शिकविल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार विद्यार्थाद्वारेनिदर्शनात आणण्यात आला आहे. हि बाब अत्यंत गंभीर असून केवळ विद्यर्थ्यांचा भवितव्याशीच नव्हे तर बांधकाम क्षेत्रातील गुणवत्तेच्या सुरक्षिततेबाबत मोठा प्रश्न या बाबीमुळे उपस्थित झाला आहे. सदर घटनेमुळे विद्यार्थी व पालकांमध्ये असंतोषाचे व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थापत्य (सीविल) विभागातील अधिव्याख्यात्यांच्या ३ जागा रिक्त असल्याने विद्यार्थी-प्राध्यापक प्रमाण राखले जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जावर परिणाम होत असल्याचेही दिसून येत आहे. ग्रामीण भागातील इंजिनीअरिंगच्या संकल्पना आणि प्रोग्रॅम हे विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने समजत नसल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे,.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *