पन्हा!कोळसा वाहतक करणार दोन टकामध्य भिडत

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी खापा: परजिल्ह्यातून अदानी पावर प्लांट तिरोडा येथे कोळशाची वाहतूक करणाया दोन ट्रकची अमोरा-समोर धडक झाली. ती घटना २९/८/२३ ला मंगळवारच्या रात्री एक वाजेच्या दरम्यान घडली. सदर धडकेमध्ये दोन्ही ट्रकच्या दर्शनी भागाच्या चेदामेदा झाला असून, एक जण गंभीर जखमी तर दुसरा किरकोळ जखमी झाले असून कोणतीही जीवित हानी झालेली नाही .घटना मोहाडी येथील कोर्टासमोर घडली आहे. सध्या तुमसर- भंडाराबालाघाट हा राष्ट्रीय महामार्ग घोषित झाला असून या मार्गावरून मोठ्या प्रमाणात कोळशाची वाहतूक होत असून, कोळसा वाहतूक करणारे ट्रक मोठ्या भरधाव वेगाने धावत असून त्यावरील नियंत्रण सुटत असल्याकारणाने सदर अपघात घडत आहेत. मागील दोन दिवसा अगोदर खरबी येते असेच प्रकारे ड्रायव्हरच्या अनियंत्रित पणामुळे एका दाम्पत्याच्या मृत्यू झाला व एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असताना ,आज त्याच अदानी पावर प्लांट मध्ये दोन ट्रक मध्ये आमोरा समोर धडक झाल्यामुळे पुन्हा या घटनेला पेव फुटले आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभागासह उप प्रादेशिक.परिवहन विभाग सुद्धा झोपेचे सोंग घेऊन शांत बसले आहे. उमरेड वरून कोळसा भरून तिरोडाकडे जाणारा ट्रक क्र. एमएच-४० / इॠ -९४५९ व अदानी पावर प्लांट मधून कोळसा खाली करून जाणारा ट्रक क्रमांक टऌ४० अङ-४५५७ यांच्यात समोरासमोर धडक होऊन ट्रकच्या दर्शनी भाग नुकसान झाले .

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *