पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी :- तालुक्यातील सेलोटी येथे घरघुती भांडणावरून पतीने पत्नीवर लाकडी पाठाने डोक्यावर मारून प्राणघातक हल्ला केल्याची घटना मंगळवारी (ता. २९) पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेनंतर पती घटना स्थळावरून पसार झाला होता. या घटनेत पत्नी गंभीर झाली होती उपचारादरम्यान तिचा नागपूर येथे मृत्यू झाला. तर आरोपी पतीचे मृतदेह सेलोटी येथील नाल्यात असलेल्या बंधाºयात तरंगताना बुधवारी (ता. ३०) दुपारी ११.३० वाजता आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. भारती भारत चाचेरे वय ४० वर्ष असे मृत पत्नीचे नाव आहे. तर भारत दशरथ चाचेरे वय ४५ असे पतीचे नाव आहे. मृतक भारती भारत चाचेरे व आरोपी भारत दशरथ चाचेरे हे पती पत्नी असून घरघुती क्षुल्लक कारणावरून नेहमीच त्यांच्यात भांडण होत होते. याच घरघुती भांडणावरून पती भारत चाचरेयाने त्याची पत्नी भारती भारत चाचेरे हिच्या डोक्यावर लाकडी पाठाने मारहाण केली. यात ती रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत स्वयंपाक घरात पडली असल्याचे घरातील मुलांना दिसली तर वडील भारत दिसला नाही. त्यामुळे मुलांनी आरडा ओरड करून लगेच तिला उपचारासाठी लाखनी येथे नेण्यात आले. परतू प्रकृती अत्यवस्थ असल्याने तिला भंडारा येथे नेण्यात आले. तिथूनही नागपूर येथे हलविण्यात आले.

उपचारादरम्यान तिचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे मृत्यू झाला. तर भारत हा घटना स्थळावरून पसार झाला होता. त्याच्या शोधार्थ पोलिसांची पथके रवाना झाली होती. पत्नीचा खून केल्याने बुधवारी ११.३० वाजताच्या सुमारास त्याचा मृतदेह गाव नाल्यात असलेल्या बंधाºयात तरंगताना आढळला लगेच घटनेची माहिती लाखनी पोलिसांना देण्यात आली. घटना स्थळावर अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशांत सिंह, पोलीस निरीक्षक मिलिंद तायडे, पोलीसअंमलदार विलास खोब्रागडे, रामकृष्ण बावनकुळे, चालक स्वप्नील कहालकर यांनी भेट दिली. उपस्थित नागरिकांच्या व नातेवाइकांच्या मदतीने मृतदेह नाल्याबाहेर काढण्यात आले. घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी साठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण कळेल. शोकाकुल वातावरणात दोघांवरही अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. पत्नीचा खून केल्याच्या प्रायश्चित्त मुळेच भारत ने आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तविण्यात येत होता. मात्र या क्लेशात त्यांची दोन्ही मुले अनाथ झाली आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *