मोहाडी परिसरात आंब्याच्या झाडांना आला ‘मोहोर’ उशिरा

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : आंबा म्हटलं तरी तोंडाला पाणी सुटतो. आपल्या भंडारा जिल्हात व मोहाडी तालुक्यातील आपल्या सर्वांच्या शेतामध्ये आंबा असतो आणि साधारणपणे जानेवारी महिन्यात आंब्याला मोहर लागते. परंतु आंब्याचे मोहर हे मोठ्या प्रमाणात गळून जाते.त्यामुळे आपल्याला आंब्याचे कमी उत्पन्न मिळते. आंबा हा भारताचा फळ राजा आहे. आपल्या सर्वांना आंबा खूप आवडतो. रोजच्या आहारामध्ये फळांना खूपच महत्त्व आहे. प्रगत देशांपैकी आजही भारतामध्ये फळांचे आहारात कमी प्रमाण आहे. आंब्याची लागवड हे सर्वत्र केली जाते आणि बाजारामध्ये आंब्यांना खूपच मागणी असते. आंबा हा उन्हाळ्यामध्ये येणारा फळ आहे. परिपक्व फळांचा रंग, अतिशय चविष्ट, आणि उत्कृष्ट गोष्टी कथा या गुणांमुळे आंबा हा जगातील जगातील महत्त्वाच्या फळांपैकी एक आहे. पावसाळी हंगामातील परतीच्या पावसाचा कालावधी वाढल्याने आंबा पिकावर परिणाम झाला आहे. त्यामुळेच उशिराने आंब्याच्या झाडांना मोहोर आल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. जिल्ह्यात यावर्षी परतीच्या पावसाने नोव्हेंबर अखेरीस आणि डिसेंबरच्या सुरवातीस हजेरी लावल्याने शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशातच परतीच्या पावसाचा कालावधी यावर्षी वाढल्याने याचा परिणाम आंबा फळपिकांवर होण्याची शक्यता आहे.

आंबा पिकाला उशिरा मोहोर येऊन आंबा उत्पादन जून महिन्यापर्यंत लांबण्याची शक्यता शेतकºयांनी व्यक्त केली. दरवर्षी निसर्गाचा वाढत चालेला लहरीपणा, तसेच लांबत असलेला पाऊस, त्यामुळे वातावरणात होणारा बदल यांचा परिणाम हंगामी पिकांवर मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. साधारणपणे सप्टेंबर महिन्यात परतीच्या पावसाला सुरवात होते, मात्र यावर्षी पावसाने नोव्हेंबर -डिसेंबर जानेवारीपर्यंत हजेरी लावली असल्याने शेतकºयांची अवस्था नाजूक झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात थंडीला सुरवात होऊन आंबापिकाला मोहोर येण्यास सुरवात होत असते. मात्र, यावर्षी नोव्हेंबरमध्ये पाहिजे तेवढी थंडी नसल्याने आंब्याच्या झाडांना उशिराने मोहोर येण्याची शक्यता आहे. परिणामी आंबा हंगाम लांबणार आहे. त्यामुळे आंबे तयार होण्यास जून उजाडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आंब्याला कलम केल्यामुळे अवघ्या तीन ते चार वर्षांमध्ये आंब्याला मोहर लागण्यास सुरुवात होते.

कलमाच्या उघड्या बुंध्यावर बोडोर्पेस्ट लावावी. कलम केलेल्या बुडनचा खालच्या भागावर वेळोवेळी येणारी नवीन पालवी खुडून टाकावी. आंबा हे पावसाच्या पाण्यावर येणारे पिक आहे. कलम करून लावल्यावर पहिली दोन ते तीन वर्षे आंब्याला पाणी देणे आवश्यक आहे. त्यामुळे कलम मरण्याचे प्रमाण कमी होते आणि कलमे पुढे चांगली वाढतात. कलम लावल्यावर पहिल्यावर्षी हिवाळ्यात आठवड्यातून एक वेळ आणि उन्हाळ्यात दोन वेळा पाणी द्यावे. दुसºया वर्षी हिवाळ्यातपंधरा दिवसांतून एक वेळ व उन्हाळ्यात आठवड्यास एक वेळ पाणी द्यावे. तिसºया वर्षी हिवाळ्यात महिन्यातून एक वेळ आणि उन्हाळ्यात महिन्यातून दोन वेळा पाणी द्यावे. पाणी देण्यासाठी कलमांच्या बुडन भवती आळे करावे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *