प्रेम प्रकरणातून युवकाचा आई व मुलीवर प्राणघातक हल्ला

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : घरात बसलेल्या महिलेवर व तिच्या अल्पवयीन मुलीवर एका युवकाने अचानक घरात प्रवेश करुन धारदार शस्त्राने महिलेच्या मानेवर व अल्पवयीन मुलीच्या पायावर जोरदार हल्ला चढवित प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना आज दि. १ मार्च शुक्रवार ला दुपारी १.३० वाजता दरम्यान तुमसर शहरातील दुर्गा नगरात घडली. सिमा धनंजय उके (४५) व १७ वर्षीय मुलगी रा. दुर्गा नगर तुमसर असे प्राणघातक हल्ल्यात जखमी झालेल्या आई-लेकीचे नाव आहे. तर विश्वास चंद्रिकापुरे (२५) रा.कुंभारे नगर तुमसर असे आरोपी युवकाचे नाव असून तो फरार झाला आहे. घटनेच्या दिवशी दुपारी १.३० वाजता दरम्यान स्वत:च्या घरी आई व मुलगी घरी बसली असताना अचानक आरोपी विश्वास ने जखमींच्या घरी प्रवेश करून धारदार शस्त्राने महिलेच्या मानेवर व अल्पवयीन मुलींच्या पायावर चाकूने हल्ला चढविला असता आई व मुलीने घराबाहेर पळ काढत आरडाओरड केली. व लगतच्या घरी जात आपला जिव वाचविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान सदर घटनेची माहिती होताच घटनास्थळी नागरीकांची गर्दी झाली होती.

जखमींना भंडारा येथिल जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. सध्या आईवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर अल्पवयीन मुलीला सुट्टी देण्यात आली, अशी माहिती आहे. जखमी सिमा उके ची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असल्याची माहिती समोर आली आहे. प्राणघातक हल्ला करणारा आरोपी विश्वास चंद्रिकापुरे हा हल्ला करुन घटनास्थळावरुन पसार झाला आहे. आरोपी हा जखमींच्या घरी दुचाकीने आला होता अशी माहिती आहे. तर हल्ला करुन स्वत: च्या घरी जाऊन एका चार चाकी ओमनी वाहनाने पसार झाल्याचे वृत्त आहे.

वृत्त लिहेस्तर आरोपी युवकाला अटक करण्यात आली नव्हती. आरोपीच्या मागावर तुमसर पोलीस रवाना झाले आहेत. सदर हल्ला प्रेमप्रकरणातून झाला असल्याच्या चर्चा आहेत. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी रश्मिता राव, पोलिस निरीक्षक निलेश ब्राम्हणे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक विजय पंचबुधे, गिते, जयसिंग लिल्हारे व तुमसर पोलीस दाखल झाले. याप्रकरणी तपास तुमसर पोलीस करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *