आ. भोंडेकर यांनी दिली स्वनिधितुन उपजिल्हा रुग्णालयाला रुग्णवाहीका भेट

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : भंडारा-पवनी विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्याआरोग्य सेवेकरीता स्वनिधीतून तुमसर उपजिल्हा रुग्णालयाला २७ जुन रोजी रुग्णवाहीका भेट दिली. सदर रुग्णवाहिकेचे लोकार्पण आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यातच आमदार भोंडेकर यांच्या वाढदिवसा निमित्त उपजिल्हा रुग्णालयात व शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. तुमसर शहर व तालुका शिवसेना शिंदे गटाकडून आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर तसेच येथिल गरजु रुग्णांना मोफत चष्मे वाटप करुन शेवटी फळ व बिस्किटे वाटप करण्यात आले. याप्रसंगी आमदार नरेंद्र भोंडेकर, शिवसेना (शिंदे गट) भंडारा जिल्हा प्रमुख अनील गायधने, शिवसेना भंडारा जिल्हा संघटक किशोर चौधरी, उपजिल्हा प्रमुख नरेश उचीबगले, शिवसेना शहर प्रमुख नितीन सेलोकर, उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ धिरज लांबट, माजी उपसभापती उपेश बांते, रामनारायण केजरीवाल, तालुका प्रमुख नितेश वाडीभस्मे, उपशहर प्रमुख किशोर यादव, उपशहर प्रमुख मोहनीश साठवणे, उपशहर प्रमुख शेखर जांगडे, विभाग प्रमुख भुषण बुधे, फिरोज पठाण, भरत चन्ने, अनील पडोळे, विकास बडवाईक, राकेश बडवाईक, संजय डोये, अनील सिगांळे, मारोती समरीत, भोजराज वंजारी, रवी बडवाईक, शाहीद पठाण, लोकेश मेश्राम, ललीत ठाकरे, नितीन राऊत, नितेश कंगाले, मोहन कनपटे आदी शिवसैनिक उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.