आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या संघर्षामुळे महसूल विभागातील तीन अधिकारी निलंबित

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनने भंडारा जिल्ह्यातील कोतवाल व पोलीस पाटील भरती-२०२३ घोटाळा प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी व पुन्हा नव्याने परीक्षार्थींची परीक्षा घेण्यात यावी या मागणीला घेऊन दि. ११ मे २०२३ ला जिल्हाधिकारी यांना आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (ए. आय. एस. एफ.) चे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड वैभव चोपकर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. दि.१७ में पासून ते ३० में पर्यंत आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन चे राज्य सचिव कॉम्रेड वैभव चोपकर यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी तुमसर कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले होते. त्यांच्या आंदोलनाला यश आले असून अखेर महसूल विभागातील तीन अधिकाºयांना निलंबित करण्यात आले आहे. याच दरम्यान भंडारा, पवनी, साकोली, लाखनी तालुक्यातील कोतवाल भरती पार पडली व यात मोठ्या प्रमाणावर आर्थिकगैरव्यवहार झाल्याची तक्रार परीक्षार्थीं आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन कडे घेऊन आले असता कॉम्रेड वैभव चोपकर यांच्या नेतृत्वाखाली दि.२९ मे रोजी जिल्हाधिकारी यांची भेट देऊन सदर भरती रद्द करून फेर परिक्षा घेण्यात यावी अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून केली होती, तेव्हा जिल्हाधिकारी यांनी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले व तुमसर येथे सुरू असलेले आंदोलन मागे घेण्याची सूचना केली असता आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन ने प्रशासनाच्या निषेधार्थ व मागण्यांच्या समर्थनार्थ निदर्शने करीत आंदोलन अनिश्चित काळासाठी मागे घेतले होते.

तरी या सदर बाबींची दखल घेत प्रशासनाने चौकशी सुरू केली असता सदर भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावरगैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आले व ४ लोकांवर गुन्हा नोंद करून ३ लोकांना अटकही करण्यात आली आहे. तरी सदर घडामोडींवरून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार जिल्ह्यात झाले आहे असे सिद्ध होते. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील सदर भरती रद्द करून नव्याने परीक्षा घेण्यात यावी या मागणीचे निवेदन आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन भंडारा जिल्हा कौन्सिल कडून जिल्हाधिकारी यांना देण्यात आले होते. आंदोलनाच्या परिणामी पोलिस पाटिल आणि कोतवाल भरती प्रकरणात तत्कालीन भंडारा एसडीओ रविंद्र राठौड, भंडारा तहसीलदार अरविंद हिंगे आणि पवनी तत्कालिन तहसीलदार नीलिमा रंगारी निलंबित झाले आहेत. सदर प्रकरणात भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक भ्रष्टाचार हे तुमसर-मोहाडी तालुक्यात झाले आहे. तरी या दोन्ही तालुक्यातील दोषी अधिकाºयांवर कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन महाराष्ट्र राज्य सचिव कॉम्रेड वैभव चोपकर यांनी दिला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.