भंडारा येथील महिलेच्या हॅन्डबॅगमधून उडवले सोन्याचे दागिने व रोख रक्कम

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : दि. २८ मार्च रोजी दुपारी भंडारा गोंदिया बसने तिरोडा येथे येऊन दुसरी बस पकडणाºया महिलेचे बॅग मधुन सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ४,२०,५०० रुपयांचा ऐवज दोन अज्ञात महिलांनी उडवल्याची तक्रार या महिलेने तिरोडा पोलीस स्टेशन येथे दिल्यावरून पोलिसांनी अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास उप पोलीस निरीक्षक चिरंजीव दलालवाड करीत आहेत. खातरोड, तुलसी नगर केसलवाडा, भंडारा येथील र-ि हवासी महिला सीमा किशोर ठाकरे हिने पोलीस स्टेशन तिरोडा येथे दिलेल्या तक्रारीनुसार ती दिनांक २८ मार्च रोजी भंडारा तिरोडा गोंदिया बसने दुपारी ४ वाजता चे दरम्यान तिरोडा बसस्थानकावर उतरून धापेवाडा जवळील नवेगाव येथे जाण्याकरिता धापेवाडा बसमध्ये बसण्यास जात असता तिचे हॅन्डबॅग मधून दोन अज्ञात महिलांनी एकूण १७ नग ७५.६ ग्रॅम वजनाचे ३ लक्ष ९५ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख २५ हजार असा एकूण ४ लक्ष २० हजार ५०० रुपयांचा ऐवज तिचे हँडबॅग मधून उडवल्याची तक्रार तिरोडा पोलीस स्टेशन येथे दिली. याप्रकरणी तिरोडा पोलिसांनी दोन अनोळखी महिलांचे विरोधात भादंवी कलम ३७९, ३४ नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास उप पोलीस निरीक्षक चिरंजीव दलाल वाड करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.