कुजलेल्या अवस्थेत आढळला वाघाचा मृतदेह

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोबरवाही : वाघाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत झाडाच्या फांद्यांनी झाकून ठेवलेला खळबळजनक प्रकार तुमसर तालुक्यातील गोबरवाही पासून ८ किलोमीटर अंतरावर खंदाड शेतशि वारात आज बुधवार १६ आॅगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजताच्या उघडकीस आला. घटनेची माहिती होताच वन विभागातील अधिकारी व पोलिस कर्मचारी रवाना झाले. भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही येथून ८ किलोमीटर अंतरावर खंदाड वन परीक्षेत्रालगत गस्तीवर असलेल्या वनरक्षकांना कुजलेल्या जनावराची दुगंर्धी आली. त्यांनी शोध घेतला असता धानाच्या शेतामध्ये झाडांच्या फांद्यांनी झाकून ठेवलेला वाघाचा मृतदेह आढळला. त्यांनी संबंधित शेतक-याकडे विचारणा केली असता तीन दिवसांपूर्वी या वाघाचा मृतदेह दिसून आला होता. भीतीपोटी आपण त्याला झाकून ठेवल्याची कबुली संबंधित शेतक-याने दिल्याचे समजते. मात्र प्रत्यक्षदर्शनी आठवडाभरापुर्वीच वाघाचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वन विभागाने वर्तविला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही ताब्यात घेतले नसून तपास वन विभागाचे पथक व पोलिस करीत आहेत. वाघाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.