गुंतवणूकदारांच्या पैशाला शासनाने संरक्षण हमी द्यावी

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : सामान्य जनतेचे पैसे अदाणीच्या घशात घालणाºया मोदी सरकारच्या विरोधात एग्लार आंदोलन मोहाडी तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमेटीच्या वतीने सोमवार दि.६ मार्च २०२३ ला दुपारी १२ वाजता मोहाडी येथील रविवार बाजारातील भारतीय स्टेट बँक समोर मोहाडी तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजेश हटवार (सातोना) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

याप्रसंगी गजानन झंझाड(काटी), देवेंद्र ईलमे (डोंगरगाव), विजय शहारे, श्रीकांत येरपुडे (आंधळगाव), आकाश काकडे (वरठी), गीता विजय बोकडे, हरिराम निमकर, महेश ढेंगे, केशव शेंडे (बेटाळा), कृष्णा वनवे, श्रीकांत डोरले, संतोष शेंडे, रामप्रसाद नेरकर, रणजीत सेलोकर, गुंडेराव बोंदरे, अरुणा श्रीपाद, वंदना गणपत मेश्राम, शोभा बुरडे, महेश पराते, धर्मराज तिवडे, विनोद हट्टेवार, नारायणप्रसाद सव्वालाखे, श्रीधर सेलोकर, जयराम कुथे, मागो ठोंबरे, महेश वंजारी, निखील शहारे, सुनिल उके, शुभम धुमनखेडे (धोप), लोकेश रोटके, भगवान बावणकुळे, विनोद बिसने, शेखर हट्टेवार, सूर्यभान बावणे, रवि थोटे हजर होते. अदानी समूहातील गैर कारभाराची हिडणबर्ग संस्थेच्या अहवालाची संसदीय समिती मार्फत चौकशी करावी,भारतीय जीवन विमा निगम, स्टेट बँक आॅफ इंडिया इतर सरकारी वित्तीय संस्थां मधील वित्तीय गुंतवणुकीची संसदेत चर्चा व्हावी, व मोदी सरकारने गुंतवणूकदारांच्या पैशाला शासनाने संरक्षण हमी द्यावी अश्या मागण्यासाठी मोहाडी तालुका व शहर काँग्रेस कमिटी कडून मोहाडी येथे एग्लार आंदोलन करण्यात आले होते. रविवार बाजारात मोहाडी तालुका व शहर काँग्रेस कमेटीचे एल्गार आंदोलन

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *