एकाच रात्री सहा बकºयांना बिबट्याने शिकार करून केले ठार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : चांदोरी उसगाव येथील अशोक नगर मधील अभादास ढोणे यांच्या येथे सोमवारी रात्री बिबट्याने हल्ला करून घरात बांधून ठेवलेल्या चार शेळ्यावर हल्ला करून त्यांचा बळी घेतला. भीमराव उईके यांच्याही एक बोकड व एक शेळी याच रात्रीला बिबट्याने शिकार करून मारली. त्यामुळे चांदोरी येथे बिबट्याने धुमाकूळ माजवल्याने दहशतीचे वातावरण आहे. कोका जंगलापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असणाºया चांदोरी येथे बिबट्याचे आगमन रोजच होत आहे परंतु आता बिबट्याने आपला मोर्चा पाळीव प्राण्यावर वळवल्याने शेतकरी व पशुपालक यांच्यामध्ये धास्ती पसरली आहे. अंभादास ढोणे यांच्या शेळ्यांचे नुकसान झाल्याने वनविभागाच्या कर्मचाºयांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून पडलेल्या नुकसानीचे पंचनामा केला आहे. अंभादास ढोणे यांचे ४४ हजाराचे तर भीमराव उईके यांचे वीस हजाराचे आर्थिक नुकसान झाले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *