ग्रीनफ्रेंड्सतर्फे ‘खेळा होळी -इको फ्रेंडली’ उपक्रम

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखनी : येथील ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब तर्फे लागोपाठ १७ व्या वर्षी लाखनी बसस्थानकावरील ‘नेचर पार्क’ वर स्वच्छता अभियान राबवून गोळा केलेला केरकचºयाची सांकेतिक प्रतिकात्मक होळी वृक्षपूजनानंतर करण्यात आला. ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब तर्फे घेण्यात येणाºया या अभिनव कार्यक्रमाला अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती तालुका शाखा लाखनी व जिल्हा शाखा भंडारा, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था जिल्हा शाखा भंडारा यांचेसोबत अशोका बिल्डकॉंन, सिद्धिविनायक हॉस्पिटल लाखनी, सेंद्रिय शेती पुरस्कर्ते अभियंता राजेश गायधनी, गुरुकुल आयटीआय व मानव सेवा मंडळ यांचे सहकार्य लाभले.

यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थी व प्रमुख अतिथी ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक मारोतराव कावळे, मंगल खांडेकर, शिवलाल निखाडे, अशोक नंदेश्वर, योगेश वंजारी, ग्रीनफ्रेंड्सचे अध्यक्ष अशोक वैद्य, कार्यवाह प्रा.अशोक गायधने यांनी केरकचरा होळी प्रज्वलित करतेवेळी होळी रे होळी केरकचरा होळी, करू नका लाकडाची होळी, खेळा होळी इकोफ्रेंडली अशा उद्घोषणा दिल्या. तत्पूर्वी ‘रंग निसर्गा’ चे स्पर्धेत सहभागी तसेच स्वच्छता अभियान राबविण्याºया व फलक लेखन स्पर्धेत विद्यार्थ्यांचे वृक्षरोपे देऊन कौतुक करण्यात आले.प्रास्ताविकपर मार्गदर्शनात ग्रीनफ्रेंड्सचे कार्यवाह प्रा.अशोकगायधने यांनी हजारो वर्षांपासून होळी सण व इतर सण कसे पर्यावरणपुरक साजरे केले जात असे व आधुनिक काळात हे सण कसे पर्यावरणनाशक झाले याचा विस्तृत इतिहास सांगून रंगाचे दुष्परिणामही समजावून दिले.

‘रंग निसर्गाचे स्पर्धे’ अंतर्गत कोरडे रंग बनवा स्पर्धेत राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालयातुन गेवेश्री निखाडे हिचा प्रथम क्रमांक तर दिक्षा बावनकुळे हिचा द्वितीय क्रमांक तर सृष्टी वंजारी हिला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. मिडलस्कुल गटात नयना पाखमोडे हिला प्रथम तर शर्वरी पडोळे हिला तर द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. समर्थ विद्यालयातुन प्रथम क्रमांक चैतन्य वंजारी याने तर द्वितीय क्रमांक पार्थ निखाडे याला प्राप्त झाला.प्राथमिक गटात माही महेश निखाडे ,माय छोटा स्कुल हिला प्रथम क्रमांक प्राप्त झाला. ‘ओले रंग बनवा’ स्पर्धेत दिक्षा बावनकुळे हिचा प्रथम तर अमोली बडवाईक हिला द्वितीय तर तृतीय क्रमांक कृणाली गभने, मयुरी झलके, सृष्टी वंजारी,चैतन्य वंजारी यांना प्राप्त झाला. प्रोत्साहनपर क्रमांक इच्छा गुप्ता यांना प्राप्त झाला. मिडलस्कुल गटात प्रथम क्रमांक वेदांती वंजारी तर द्वितीय क्रमांक उन्नती देशमुख हिला प्राप्त झाला.

होळीनिमित्त ‘संदेशपर फलकलेखन’ स्पर्धेत कृणाली गभने व सृष्टी वंजारी यांना प्रथम तर अमोली बडवाईक ला द्वितीय क्रमांक व चैतन्य वंजारी ला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. रंग निसर्गाचे उपक्रमाचे निरीक्षण ग्रीनफ्रेंड्सच्या पदाधिकारीसोबत अशोका बिल्डकॉन अभियंता नितेश नगरकर, सिद्धिविनायक हॉस्पिटलचे संचालक डॉ. मनोज आगलावे, गुरूकुल आयटीआयचे प्राचार्य खुशालचंद मेश्राम, सेंद्रिय शेती करणारे अभियंता राजेश गायधनी, लाखनी वनविभाग वनरक्षक कृष्णा सानप, राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालयाचे सेना शिक्षिका निधी खेडीकर यांनी निरीक्षण केले. कार्यक्रम संचालन योगेश वंजारी तर आभार प्रदर्शन अशोक वैद्य यांनी केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *