रेती चोरी करणाºयांची माहिती द्या

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : तालुक्यातून मोठ्या प्रमाणात रेती चोरी केल्या जाते. तसेच बेकायदेशीर उत्खनन करण्यात येते त्याची माहिती तात्काळ तालुका प्रशासनाला कळवा, असे आवाहन करून मोहाडीचे तहसीलदार सुरेश वाघचौरे यांनी आल्या आल्या तीन वाहनांवर कारवाई केली आहे. आता रेती चोरांची गय केली जाणार नाही. बेकायदेशीर होणाºया उत्खननावर प्रतिबंध करण्यासाठी केव्हांही सामान्य नागरिकांनी तालुका प्रशासनाला माहिती द्यावी. त्यावर तात्काळ कृती अंमलात आणली जाईल असे तहसीलदार सुरेश वाघचौरे यांनी सांगितले. तहसीलदार म्हणून रुजू झाल्यानंतर प्रथमच सुरेश वाघचौरे यांनी अवैध वाहतूक करणाºया रेतीच्या चार व मुरमाच्या तीन वाहनांवर कारवाई करून १८ लाख २० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच बेटाळा येथील दोन व रोहा येथील एकअशा तीन बेकायदेशीर रेती साठ्यांची जप्ती करून लिलाव करण्यात येणार आहे.

मोहाडी तालुक्यातून उत्खनन व वाहतूक होणार नाही यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याबाबत जिल्हाधिकारी भंडारा व उपविभागीय अधिकारी तुमसर यांनी दिलेल्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. रेती चोरी व नियमबाह्य उत्खनन पकडण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे,तपासणी चौक्या, भरारी पथके स्थापना, महा खनिज अ‍ॅपवर ईटीपी तपासणी, अवैध ईटीपी असणाºया वाहनावर अवैध रेती साठे जप्ती व लिलाव या उपाययोजना काटेकोरपणे करण्यात आल्या आहेत. मोहाडी तालुक्यात बेटाला, रोहा व सातोना या तीन ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेबसविण्यात आले आहेत. ते कॅमेरे २४ तास देखरेख करणार आहेत.

तीन ठिकाणी वाहनांची दिवस-रात्र तपासणी करण्यासाठी चौक्या उभारण्यात आल्या आहेत. त्या चौक्यांवर तलाठी, कोतवाल व पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे.शिवाय प्राप्त होणाºया तक्रारीनुसार कारवाई करण्यासाठी भरारी पथके कार्यरत आहेत. तक्रारीच्या ठिकाणी अथवा रेती चोरी होत असलेल्या ठिकाणांना भेटी देऊन भरारी पथके कारवाई सज्ज झाले आहेत.तलाठी मंडळ अधिकारी व भरारी पथकांना आढळून आलेल्या बेकायदेशीर रेती साठ्यांची जप्त करून त्याच्या लिलावाद्वारे महसूल वसूल करण्यात येणार आहे. माहे एप्रिल २०२३ पासून रोहा बेटाळा, पाचगाव, मोहगाव देवी या ठिकाणच्या ३३२ ब्रास अवैध रेती साठ्याचा जप्ती नंतर लिलाव करून १३८०० रुपये महसूल वसूल करण्यात आला आहे असे तहसीलदार सुरेश वाघचौरे यांनी सांगितले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.