चिचगड ग्रामीण रुग्णालयात आरोग्य सेवेचा बोजवारा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी चिचगड : देवरी तालुक्यातील चिचगड ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी यांच्यासह इतर आरोग्य कर्मचाºयांची अनेक पदे रिक्त असल्याने आदिवासी बहुल, जंगलव्याप्त, नक्षलग्रस्त भागात आरोग्य सेवेचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. संबंधित यंत्रणेने चिचगड ग्रामीण रुग्णलयातील रिक्त पदे भरून येथील आरोग्य सेवा सुरळीत करावी, अशी अपेक्षा परिसरातील नागरिक बाळगून आहेत. नक्षलरित्या अतिसंवेदनशील असलेल्या चिचगड येथील ग्रामीण रुग्णालयाकडे शसन व प्रशासनाकडून कायमच दुर्लक्ष झाले. शासनाकडून या भागाचा विकास करण्याकरिता आराखडा तयार होतो, परंतु संबंधीत यंत्रणांकडून त्या आरखड्याला पूर्णत्वास आणण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. येथे वैद्यकीय अधिकारी यांच्यासह दोन डझनपेक्षा जास्त पदे मंजूर आहेत.

प्रत्यक्षात आजघडीला डझनभर पदे रिक्त आहेत. येथे कमी असलेले मनुष्यबळ आणि विविध यंत्रसामुगह्यी, औषधे यांचा साठा नसल्याने सध्या या रुग्णालयात कार्यरत अधिकारी आणि कर्मचाºयांना रुग्णांना रेफर करण्यापलिकडे उपाय नाही. रुग्ण देखील या रुग्णालयात न जाता खासगी डॉक्टरांकडे जाणे पसंत करतात. प्रसंगी उपचाराअभावी अनेक रुग्णांवर जीव गमवण्याची वेळ आली आहे. चिचगड परिसर जंगलव्याप्त, दुर्गम आणि आदिवासी बहूल आहे. परिसरातील नाले, नद्यांवर अद्याप पक्के पूल नाहीत. त्यामुळे विकासाची गंगा अद्याप या भागात पोहोचलीच नाही. आरोग्याची सुविधा अत्यावश्यक सेवांमधून एक आहे. मात्र हीच सेवा या भागात गेल्या काही वर्षांपासून बारगळली आहे. चिचगड येथील गह्यामीण रुग्णालय नावालाच आहे. या रुग्णालयात विविध संवर्गाचे २५ पदे मंजूर आहेत. प्रत्यक्षात आजघडीला अर्धी पदे रिक्त आहेत. आरोग्य विभागाने रिक्त पदे तत्काळ भरून गह्यामीण रुग्णांना दिलासा द्यावी, अशी माफक अपेक्षा येथील नागरिक बाळगून आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *