आषाढी एकादशीनिमित्त मध्य रेल्वेच्या ७६ विशेष गाड्या

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : कोट्यवधी वारकºयांच्या आस्थेचा विषय असलेल्या पंढरपूर वारीने मध्य रेल्वेलाही आकर्षित केले आहे. त्यामुळे यंदा मध्य रेल्वेतर्फे पंढरपूर आषाढ वारीसाठी तब्बल ७६ रेल्वेगाड्या चालविण्याची तयारी मध्य रेल्वेने केली आहे. नागपूरहून मिरज, नागपूरपंढरपूर यासह नवीन अमरावतीपंढरपूर, खामगाव- पंढरपूर, भुसावळपंढरपूर, लातूर- पंढरपूर, मिरजपंढरपूर, मिरज- कुर्डूवाडी या विशेष गाड्या ‘पंढरपूर आषाढी एकादशी’ निमित्त चालविल्या जाणार आहेत. परिणामी, लाखो भाविकांची सोय होणार आहे.

नागपूर- पंढरपूर विशेष गाडी क्रमांक ०१२०७ स्पेशल नागपूरहून २६ जून आणि २९ जून २०२३ रोजी सकाळी ८:५० वाजता नागपूरहून सुटणार आहे. दुसºया दिवशी सकाळी आठ वाजता ही गाडी भाविकांना पंढरपूरला पोहोचविणार आहे. गाडी क्रमांक १२०८ विशेष पंढरपूरयेथून २७ आणि ३० जून रोजी सायंकाळी पाच वाजता सुटेल आणि दुसºया दिवशी दुपारी १२:२५ वाजता नागपूरला पोहोचेल. या गाडीला एक द्वितीय वातानुकूलित, दोन तृतीय वातानुकूलित, १० शयनयान आणि सात सामान्य द्वितीय श्रेणी यासह दोन लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅन राहणार आहे.

गाड्यांचे थांबे

या गाड्यांचे थांबे अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर रेल्वे, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड आणि कुडुर्वाडी येथे राहणार आहे.

नवीन अमरावती- पंढरपूर विशेष

गाडी क्रमांक ०१११९ विशेष गाडी नवीन अमरावती येथून २५ आणि २८ जून रोजी दुपारी २:४० वाजता सुटेल आणि दुस?्या दिवशी सकाळी ९:१० वाजता पंढरपूरला पोहोचेल. गाडी क्रमांक ०११२० विशेष गाडी पंढरपूर येथून २६ आणि २९ जून रोजी रात्री ७:३० वाजता सुटेल आणि दुसºया दिवशी दुपारी १२:४० वाजता नवीन अमरावती स्थानकावर पोहोचेल.

येथे थांबणार, भाविकांना घेणार

ही गाडी बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, जलंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुडुर्वाडी स्थानकावर थांबेल. येथूनही भाविक या गाडीत बसू शकणार आहेत. या गाडीत एक द्वितीय वातानुकूलित, दोन तृतीय वातानुकूलित, १० शयनयान, सात सामान्य द्वितीय श्रेणी यासह दोन लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅन राहणार आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *