उच्च शिक्षणाच्या माध्यमातून युवकांनी प्रशासकीय सेवेत सहभाग घ्यावा : नाना पटोले

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : विधानसभा क्षेत्रातील सर्व समाज बांधवांच्या गरजा व सोयी लक्षात घेऊन विकासात्मक वाटचालीसाठी प्रयत्न सुरू आहेत. कोहळी समाज बांधवांच्या विविध कार्यक्रमासाठी आवश्यक असलेल्या सभागृहाचे लोकार्पण आज होत आहे. या माध्यमातून समाज बांधवांना कार्यक्रमासाठी आपल्या हक्काचे सभागृह उपलब्ध झाले आहे. युवकांनी प्रशासकीय सेवेत सहभागी होण्यासाठी उच्चशिक्षण घेण्याचे आवाहन आमदार नाना पटोले यांनी केले ते लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलत होते. कोहळी समाज सामाजिक कल्याणकरी संस्थेच्या वतीने सेंदूरवाफा येथील बिरसा मुंडा चौकात आमदार नाना पटोले यांच्या २५ लक्ष रुपयांच्या निधीतून साकार झालेल्या कोहळी समाज सभागृहाचे लोकार्पण व २५ लक्ष रुपयांच्या आमदार निधीतूनच नव्या कामाचा भूमिपूजन सोहळा नाना पटोले यांच्या हस्ते दि. ७ फेब्रूवारी २०२३ रोजी पार पडला. याचवेळी संस्थेच्या वतीने कोहळी समाजातील मान्यवर नेते, साहित्यिक, कलावंत, क्रीडापटू व गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. यात माजी आमदार बाळा काशीवार, ज्येष्ठ झाडीबोली संशोधक बोलीमहर्षी डॉ. हरिश्चंद्र बोरकर, पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ.परशुराम खुणे, संंतकवी डोमाजी कापगते, नवनियुक्त भूगर्भशास्त्रज्ञ कपिल कापगते, माजी सुभेदार रामजी कापगते, केवळराम कापगते, क्रीडापटू पल्लवी डोंगरवार, हेमलता संग्रामे आदींचा सत्कार करण्यात आला. कपिल कापगते यांच्या वतीने वडील एकनाथ व आई रेखा कापगते यांनी सत्कार स्वीकारला. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ असे या सत्काराचे स्वरूप होते. यावेळी व्यासपीठावर आमदार नाना पटोले यांचे सोबत माजी आ. डॉ. हेमकृष्ण कापगते, प्रकाश बाळबुद्धे, जि.प.सभापती मदन रामटेके, अमोल मुंगमोडे, माजी जि.प.सदस्य अशोक कापगते, माजी पं.स.सभापती श्रावण बोरकर, पं.स.सदस्य होमराज कापगते, माजी सरपंच हुसन कापगते, डॉ.केशव कापगते, अश्विन नशीने, माजी नगरसेवक रवि परशुरामकर व अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी सेंदूरवाफा येथील कोहळी समाज सामाजिक कल्याणकारी संस्थेच्या अध्यक्ष प्रिती डोंगरवार, सचिव पुष्पा कापगते, सदस्या कुंदा मुंगुलमारे, गीता बोरकर, सीमा कापगते, सुनिता कापगते, संगिता खुणे, तेजस्वीनी डोंगरवार, आशाराणी बोरकर, गीता हातझाडे, रत्नमाला कापगते, भारती हातझाडे, सुरेखा मुंगुलमारे तसेच सर्व महिला समिती सदस्या यांनी उपस्थित राहून यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *