रोहाची रेखा कुंभलकर प्रथम तर मोहंगावदेवीची मनिषा बंसोड द्वितीय

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी, आरोग्य विभाग जिल्हा परिषद भंडारा व तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती मोहाडीच्या वतीने आशा दिवस कार्यक्रम मोहाडी येथील पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आले. सन २०२१-२०२२ या वर्षांमध्ये ज्या आशांच्या कार्यक्षेत्रात एकही बालमृत्यू, माता मृत्यू झाले नाही आरोग्याची काळजी घेणारे करडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील गंगा टेंभुरकर, बेबीनंदा जगनिक, साधना गायधने, श्यामकला तिबुडे, सीमा निमजे, ममता गजभिये, शकुन ढेंगे, सविता बुधे, अनिता पिंगळे, वर्षा खोकले, पौर्णिमा गाढवे, शालिनी गोंडाणे, लक्ष्मी ढेंगे, पुष्पा वहिले, गीता मेश्राम, सविता चव्हाण, बबिता समरीत, यशोदा मुंगुसमारे, प्रतिमा गोबाडे, रितू बिसेन, कला घोनमोडे, माया खराबे, उषा बावनकर, गौतम बागडे. वरठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील अनिता सरोदे, ममता बनसोड, मंजू रामटेके, मनीषा मडामे, रचना वासनिक, वनिता बोरकर, योगिता गणवीर, प्रेमकला धुर्वे, शांतावंजारी, शशिकला गायधने, कल्पना माटे, नीलिमा भोयर, सुलका कडव, छाया पडोळे, निर्जला पारधी, आशा रेहपाडे, वनिता भोवते, मंगला चन्ने, मंजुषा सव्वालाखे, देवला दमाहे खमारी बुज, सिंधू बांते, सुरेखा दमाहे, सीमा डोंगरे, सुकेशनी गजभिये यांना जिल्हा आरोग्य अधिकारी भंडारा व तालुका आरोग्य अधिकारी मोहाडी यांच्या सहीनिशी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती रितेश वासनिक हे होते. विशेष अतिथी म्हणून जिल्हा परिषदचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मिलिंद सोमकुवर, आरोग्य पर्यवेक्षक चंद्रमणी मेश्राम, जिल्हा समूह संघटक चंद्रकुमार बारई तर नगराध्यक्ष छाया छाया डेकाटे, उपसभापती विठ्ठल मलेवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विकास मेश्राम, वैद्यकीय अधिकारी डॉ.हिमांशू मते आंधळगाव, डॉ.निंबेकर बेटाळा, डॉ.हर्षदा कटरे जांब, दैनिक भंडारा पत्रिकाचे यशवंत थोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या छायाचित्राला पुष्पमाला अर्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आले. पाहुण्यांचे स्वागत गटप्रवर्तक शेषा राजेश सव्वालाखे, शैला योगेश्वर तितीरमारे, लिलावती रविंद्र दलाल, संगिता बाळकृष्ण उरकुंडे, मधु युवराज जमाईवार, रसिला सुतिष्ण चोपकर, सरिता गोपीचंद जेठे, ज्योती राजेंद्र बावणे यांनी केले. सन २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात मोहाडी तालुक्यातील सर्वाधिकमोबदला प्राप्त करणारे बेटाळा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत रेखा रमेश कुंभलकर रोहा प्रथम तर मनिषा हिरालाल बंसोड मोहगावदेवी द्वितीय क्रमांक पटकाविल्याबद्दल सभापती व उपसभापतीच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन गौरवण्यात आले. घेण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत सुषमा मिताराम शेंडे वासेरा प्रथम तर सुषमा मारोती बोदरे चिचखेडा द्वितीय. गीत गायन स्पर्धेत सुलोचना दिनदयाल लोहबरे पाचगाव प्रथम तर उषा राजेश बावणकर पालोरा द्वितीय. नृत्य स्पर्धेत लक्ष्मी मिताराम ढेंगे देव्हाडा खुर्द प्रथम तर मनिषा हिरालाल बंसोड मोहगावदेवी द्वितीय क्रमांक पटकाविल्याबद्दल तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विकास मेश्राम यांच्या हस्ते डायरी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लेखापाल विशाल वासनिक,संजय चव्हाण, रजत रडके, सीमंतिनी कठाणे, मनिषा निमजे, मेश्राम, शिशुपाल खंडाते, रणवीर कोटांगले यांनी परिश्रम केले. प्रास्ताविक तालुका समूह संघटक स्नेहा दहिवले यांनी केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन आरोग्य सहाय्यक आशीष डोंगरे यांनी केले तर आभार डॉ.हिमांशू मते यांनी मानले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *