भिलेवाडा येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची शाखा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : शहरापासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या भिलेवाडा येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा स्थापन करण्यात आली. या शाखेची स्थापना बुवाबाजी संघर्ष विभागाचे राज्य सहकार्य विष्णुदास लोणारे, नितेश बोरकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. यात अध्यक्ष विनोद वाढई, उपाध्यक्ष राहुल वाढई, उपाध्यक्ष हितेश खवास, कार्याध्यक्ष रोहन वाढई, प्रधान सचिव अमित वाढई, बुवाबाजी संघर्ष कार्यवाह मनोज वाढई, विविध उपक्रम कार्यवाह सुकेशिनी वाढई, वैज्ञानिक जाणीवा प्रकल्प प्रमोद वाढई, सदस्य राजू वाढई, चेतन कुथे, मोहनदास वाढई, आकाश वाढई यांची निवड करण्यात आली.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनसमितीच्या जिल्ह्यात आतापर्यंत भंडारा, लाखनी, साकोली, चिचाळ, लाखांदूर, धर्मापुरी, पालांदूर, कन्हेरी, पवनी, अड्याळ, वरठी अशा अकरा शाखा स्थापन करण्यात आल्या आहेत. गाव तिथे शाखा या उपक्रमांतर्गत नवीन शाखा स्थापन करावयाच्या आहेत. यासाठी अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करु ईच्छिणाºया कार्यकर्त्यांनी बुवाबाजी संघर्ष विभागाचे राज्यसहकार्यवाह विष्णुदास लोणारे, राज्य कार्यकारणी सदस्य प्रा. नरेश आंबिलकर, जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश नाकतोडे, जिल्हा प्रधान सचिव प्रा. युवराज खोब्रागडे, नितेश बोरकर, सौ.माया बारापात्रे, अश्विनी भिवगडे, नरहरी नागलवाडे, डॉ.विश्वजीत थुलकर, विलास केजरकर यांच्याशी संपर्क साधावा.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.