शुल्लक वादातून तरुणाची हत्या

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : शहरालगत असलेल्या गणेशपूर येथे शुल्लक वादातून एका २१ वर्षीय तरुणाची दगडाने व धारदार शस्त्राने निर्घुन हत्या करण्यात आली. सदर घटना सोमवारी रात्री ११.३० वाजता दरम्यान घडली. अभिषेक सावन कटकवार वय २१, रा. पोहरा/मेंढा ता. लाखनी, जि. भंडारा असे मृतकाचे नाव आहे.या प्रकरणी भंडारा पोलीसांनी पाच आरोपींना अटक केली असुन दोन आरोपी अद्यापही फरार आहेत..पोलीस त्यांचा कसुन शोध घेत आहेत.अटक आरोपींना आज भंडारा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींची २५ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. मृतक अभिषेक याची सासु व पत्नीला आरोपी चिराग गजभिये याने मोबाईल फोन वरुन मॅसेजेस केल्यामुळे काही दिवसा अगोदर मृतक अभिषेक व आरोपी चिराग गजभिये त्यांच्यात तोंडी वाद झाला होता.त्याची नोंदसुध्दा भंडारा पोलीसात करण्यात आली आहे. काल २१ आॅगस्ट रोजी रात्री ११:३० वाजेच्या दरम्यान, मृतक अभिषेक आणि त्याचा लहानभाऊ अरमान व अन्य तिन मित्र हे गणेशपुर भंडारा येथुन मृतक अभिषेक च्या सासूच्या घरुन दोन बाईकने जात असताना जुन्या वादावरून भांडण झाले.

दरम्यान आरोपींनी संगनमत करून अभिषेक याला अश्लिल शिवीगाळ करीत बाजुच्या नालीवरील सिमेंट चे दगड, विटांनी अभिषेकच्या डोक्यावर मारहान करीत अभिषेकच्या पोटावर व गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून अभिषेकचा खुन केला. मृतकाच्या भावाचे तोंडी रिपोर्टवरुन भंडारा पोलीस स्टेशन येथ ७ आरोपीविरुद्ध कलम कलम ३०२, १४३, १४६, १४७, १४८, १४९, २९४ भा.दं.वि. सहकलम ४/२५ भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी भंडारा पोलीसांनी अवघ्या १२ तासांत पाच आरोपींना अटक केली तर दोन आरोपी अद्यापही फरार आहेत. फरार दोन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. सदर कारवाई भंडारा पोनि. गोकुळ सुर्यवंशी, सपोनि विनोद गिरी, सपोनि अशोक जायभाये, पोउपनि मंगेश कराडे, पोहवा वाघमारे , पोअं झलके , पो.अं. लांडगे , पोना कुकडे यांनी पार पाडली असून पोलीस अधीक्षक लोहीत मतानी, अपर पोलीस अधीक्षक, ईश्वर कातकडे , भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी, डॉ. अशोक बागुल यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास पोलीस निरीक्षक, गोकुळ सुर्यवंशी आणि तपास पथक पोहवा शहारे , पोहवा भोंगाडे हे करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *