अंगणवाडी सेविका, कार्यकत्यांनी अन्याच्या विरोधात पेटून उठावे- कॉ. शुभा शमीम

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : आज झपाट्याच्या युगात प्रत्येक गोंटीची स्पर्धा लागलेली असते. मात्र त्यामुळे काय चांगले अन् काय वाईट याकडे कोणीही लक्ष देत नाही. यामुळे जीव घेणे प्रकार वाढले आहे. आपण बुध्दीजीवी आहोत. त्याचा उपयोग नौकरी व कुटूंब सांभाळत करावे. आपण गावात विविध शासकिय योजनांची महिती देत असतो. म्हणजेच नागरिक व शासन यातील महत्वाचा घटक आहोत. आपल्या कामात सदैव पारदर्शकता असते. वरिष्ठांचा मान सन्मान करणे आवश्यक आहे. त्याबरोबर जे चुकत असेल त्यावर नक्कीच बोलावे. म्हणून अंगणवाडी सेविका, कार्यकत्यांनी अन्याच्या विरोधात पेटून उठावे असे प्रतिपादन राज्य अध्यक्ष कॉम्रेड शुभा शमीम यांनी केले. त्या सीआयटीयूच्या वतीने विदर्भ दौºया दरम्यान साई मंगल कार्यालयात आयोजित महिला मेळाव्यात मार्गदर्शन करतांना बोलत होत्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य अध्यक्ष कॉम्रेड शुभा शमीम होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून राज्य महासचिव कॉम्रेड चंदा मेंढे, भंडारा व तुमसर अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षा फिरोज पठाण, कमल सेलोकर, छाया गजभिये, पद्ममा डोंगरे, मनिषा गजभिये उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मार्ल्यापण अर्पण व व्दीप प्रज्वलीत करण्यात आले. अंगणवाडी सेविका ही किशोरावस्था पासुन तर सहा वर्षाच्या मुलापर्यंत सेवा देत असते. तसेच गरोदर, स्तनंदा माता, किशोरवयीन मुली यांना आहार विषयी, स्वच्छता याबाद माहिती लक्षीकरण व वेळोवेळी येणारे शासनाचे विविध कामे करत करत आहे. आणि कोरोनाच्या काळात जिवाची पर्वा न करता घराघरात भेटी देऊन रूग्णाचा शोध घेत आजारा विषयी माहिती गोळा करून शासना पर्यंत पोहचविण्यासाठी कुठलीही अपेक्षा न ठेवता अविरत कार्य केले आहे. असे मत राज्य महासचिव कॉम्रेड चंदा मेंढे यांनी व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्र्यांवर भर देत विविध मार्मिक उदाहरण देऊन सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच भंडारा व तुमसर अंगणवाडी कर्मचारी संघटना भंडारा व तुमसर ची कार्यकारणी घोषीत करण्यात आली आहे.

भंडारा व तुमसर अंगणवाडी कर्मचारी संघटनेतील जवळपास नवदच्यावर अंगणवाडी सेविका, मदतनीस कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक अंगणवाडी सेविका चंदा मडामेयांनी केले. तर उपस्थितांचे आभार कमल सेलोकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता कविता फेंडर, चंदा मडामे, यामिनी अहिरकर, ज्योती ढेंगे, कुंदा पुडके, ज्योती रेहपाडे, नलिनी आकरे, छाया बुरडे, छाया गजभिये, सविता मस्के, सुनीता मानवटकर, पंचशिला वाघमारे, निर्मला पवार, अल्का हरडे, पंचशिला बोरकर, सिमा ठवकर, कल्पना वरकडे, मिना आरीकर, रंजना वाघमारे, हिरकन्या वंजारी, शांता कावळे, निता बांडेबुचे, राजश्री बांडेबुचे, हर्षकला गणविर, कमल राघोर्ते, शारदा केवट, प्रमिला मडावी, प्रियंका सुखदेवे, आरती लोणारे, कल्पना गणविर, जैतुरा वंजारी, रत्ना बारई, दिपाली मेश्राम, दुर्गा मुंडले, सरिता माटे, अल्का दहिवले इत्यादी अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच भंडारा व तुमसर अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.